ETV Bharat / state

न्यू व्हिजन कॉलेजचे विद्यार्थी भविष्यात क्लास वन अधिकारी होतील - मंगेश नेने

पेण तालुक्यात केवळ पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे कॉलेज आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता पेण मध्ये पुढील शिक्षण मिळविण्यासाठी न्यू व्हिजन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

पुढील शिक्षण मिळविण्यासाठी न्यू व्हिजन महाविद्यालयाची स्थापना

author img

By

Published : May 30, 2021, 12:15 PM IST

पेण (रायगड) - शिक्षकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यात केवळ पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे कॉलेज आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी फक्त पदवीधारकच झालेत. तालुक्यात अनेक शिक्षक तयार झाले आहेत. मात्र फार कमी विद्यार्थी विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता पेण मध्येच पुढील शिक्षण मिळविण्यासाठी न्यू व्हिजन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

परिसरातील विद्यार्थी डिग्री, डिप्लोमा सारखे शिक्षण घेणार

याच माध्यमातून पेण व परिसरातील विद्यार्थी यू.पी.एस.सी, एम.पी.एस.सी, पी.एच.डी, डिग्री, डिप्लोमा सारखे शिक्षण घेणार असल्याचे वक्तव्य पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी केले. ते महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी न्यू व्हिजन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजू पिचीका, उद्योजक तथा संचालक रशाद मुजावर, सुजित काठे, मिलिंद कांबळे, संचालिका प्रतिक्षा कदम, निता रामधरणे, गौरव रामधरणे, प्रणाली कांबळे आदी संचालक पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षा, इंटरनेट तसेच क्रिडा विषयक मार्गदर्शन

बाहेर गावी जाऊन अतिरिक्त खर्च करून शिक्षण घ्यावे लागते, म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहिलेले आहे. त्यामुळे आपल्याकडे अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून पाच टक्के निधी त्यांच्यासाठी वापरता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर या महाविद्यालयातील शिक्षक हे उच्च शिक्षित असणार आहेत. तसेच शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षा, इंटरनेट तसेच क्रिडा विषयक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती संचालिका निता रामधरणे यांनी दिली.

हेही वाचा - 'साई संस्थानने 100 बेडच्या बालकोविड सेंटरची उभारणी करावी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.