रायगड - राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सकाळी अलिबाग शहरात मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी प्रांताधिकारी शारदा पोवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने उपस्थित होत्या.
हेही वाचा - रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्याप्रकरणी आरोपी निर्दोष
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे पीएनपी नाट्यगृह अलिबाग, येथे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले आहेत. यावेळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आपली कला उपस्थितांसमोर सादर करणार आहेत.
हेही वाचा - रायगड जिल्ह्यासाठी 234 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर