ETV Bharat / state

नागावमध्ये पर्यटन सुरू; बीच, कॉटेज पुन्हा पर्यटकांनी बहरणार

कोरोनामुळे सात महिने बंद असलेले नागावमधील पर्यटन सुरू करण्यास ग्रामपंचायतीने परवानगी दिली आहे.

nagaon tourism starting for tourist after the lockdown
नागावमध्ये पर्यटन सुरू; बीच, कॉटेज पुन्हा पर्यटकांनी बहरणार
author img

By

Published : Sep 29, 2020, 12:14 PM IST

रायगड - कोरोना प्रादुर्भावामुळे मार्चपासून सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली होती. यात रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील नागाव येथील पर्यटनही बंद होते. पण आता सात महिन्यानंतर 1 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटन खुले करण्यात येत आहे. नागाव ग्रामपंचायतीने पर्यटन खुले करण्यास परवानगी दिली आहे. कॉटेज व्यवसायिकांनीही पर्यटन सुरू होत असल्याने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागावमधील रस्ते, समुद्र किनारे पर्यटकांनी बहरण्यास सुरूवात होणार आहेत.

नागावमध्ये पर्यटन सुरू...
अलिबाग तालुक्यातील नागाव परिसर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा, नारळ-फोफळीच्या बागा असे नयनरम्य नैसर्गिक सौंदर्य लाभलेले नागाव, कोरोनामुळे सात महिन्यांपासून पर्यटनासाठी बंद होते. त्यामुळे कॉटेजधारकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. शासनाने टाळेबंदीत हळूहळू शिथिलता दिल्यानंतर पर्यटक जिल्ह्यात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र नागाव ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटन सुरू करण्यात आले नव्हते.

आता नागावमधील पर्यटन सुरू करण्यास ग्रामपंचायतीने परवानगी दिली आहे. कॉटेजधारकांना मोफत सॅनिटायझर फवारणीही ग्रामपंचायत सरपंच आणि सामाजिक संस्थांच्या मार्फत करून दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यटन सुरू होण्याआधी सर्व उपाययोजना ग्रामपंचायत आणि कॉटेजधारकाकडून करण्यात येत आहे.

सात महिन्यापासून पर्यटन बंद असल्याने आर्थिक विवंचनेत आम्ही अडकलो आहेत. पुन्हा आता 1 ऑक्टोबरपासून पर्यटन खुले झाल्याने आनंद झाला आहे. पर्यटकाची बुकिंगही येण्यास सुरूवात झाली आहे. त्यादृष्टीने कोरोनाच्या अनुषंगाने नियम पाळून ग्राहकांना सुविधा पुरविणार आहोत, अशी माहिती कॉटेजधारक अक्षय घरत यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.