ETV Bharat / state

'भाजपला सावरकरांचा पुळका म्हणजे ढोंग'

अलिबाग येथील आगरसुरे या त्यांच्या मूळगावी आले असता ते पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी विविध विषयांवर बोलताना भाजप आणि केंद्र सरकावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत
author img

By

Published : Dec 15, 2019, 4:59 PM IST

Updated : Dec 15, 2019, 5:37 PM IST

रायगड - कोणीही मनातले मांडे खाऊ नये, स्वप्न पाहू नये, महाराष्ट्रातील सरकार किमान समान कार्यक्रमावर चालत आहे. एखादा नेता एका व्यक्तीविषयी काय बोलतो यावर सरकार टिकणार नाही. राज्यातील सरकार हे अन्न, वस्त्र निवारा, सामाजिक न्याय, आरोग्य, रोजगार, शिक्षा या विषयावर काम करत आहे. सावरकर यांचा विषय वेगळा आहे. भाजपला सावरकरांचा पुळका येणे हे ढोंग आहे, अशी टीका भाजपवर खासदार संजय राऊत यांनी केली.

बोलताना खासदार संजय राऊत

अलिबाग येथील आगरसुरे या त्यांच्या मूळगावी आले असता ते पत्रकारांशी संवाद साधत होते. खासदार राऊत पुढे म्हणाले, साडेपाचवर्षे केंद्रात भाजपची सत्ता आहे. मी स्वतः पहिल्या दिवसापासून सावकरांना भारतरत्न मिळावे, अशी मागणी करत आहे. मुंबईतील सावरकरांचे स्मारक हे बाळासाहेब ठाकरेंच्या प्रयत्नाने तयार झाले आहे.

त्यांना अजित पवारांबाबत विचारले असता ते म्हणाले, हे सरकार पाच वर्षे अजित पवारच टिकवतील आणि ते मुख्यमंत्र्यांचे खंदे सहकारी म्हणून काम करतील. त्यांना राज्यातील प्रश्नांची जाण आहे. हे सरकार यशस्वी होऊन यशात मुख्यमंत्र्याबरोबर अजित पवार यांचे योगदान महत्वाचे राहिल, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.

जीएसटी परताव्याच्या पैशावर पाकिटमारी करू नका

केंद्र सरकारने जीएसटीचे 15 हजार 500 कोटी परतावा राज्य सरकारला दिला नाही. यामुले राज्याला आर्थिक चणचण भासत आहे. हे राज्याचे पैसे असून जर पैसे मिळाले नाही तर राज्यातील शेतकऱ्याच्या तोंडचा हक्काचा घास हिरावला आहे, अशी आमची भूमिका राहील. केंद्र सरकारने घीसाड घाईने निर्णय घेतल्याने त्याचा त्रास इतर राज्याला सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या 15 हजार 500 कोटीसह पंजाबला साडेतीन हजार कोटी, केरळला 2 हजार 600 कोटी देणे लागते. अनेक लहान राज्यांना या रकमा महत्वाच्या आहेत. 4 महिन्यांपासून केंद्राने हा परतावा दिलेला नाही आणि केंद्रात मौजमजा सुरू आहे. राज्यांना पैसे देणे महत्वाचे असताना त्यामध्ये पाकिटमारी करू नका, असा टोला केंद्र सरकारला खासदार संजय राऊत यांनी मारला आहे.

देवेंद्र फडणवीस हे शहाणे आहेत

या सरकारचे पहिलेच अधिवेशन विदर्भात होत आहे. त्यामुळे विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये. सरकारला किमान सहा महिने काम करू दिले पाहिजे. त्यानंतर विरोधकांनी बोलण्याचा अधिकार आहे. विरोधकांचा आकडा हा शंभर असला तरी सत्ताधारी यांचा आकडा 175 पर्यंत पोहोचला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न इतर प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुख्यमंत्री होते आणि आता विरोधी पक्षनेते आहेत. फडणवीस यांच्याकडून विधायक कामाची अपेक्षा आहे. ते शहाणे आहेत आणि विधानसभेत ते प्रचिती दाखवतील.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचे साहित्य द्यावे

पंडित नेहरुवर नरेंद्र मोदी,भाजपचे लोक टीका करतात त्यावेळी आम्ही पंडित नेहरूंच्या बाजूने उभे राहतो. पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान हे राहणार तसेच सावरकर यांचेही योगदान राहणार. वीर सावरकर हे स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे दुसरे नाव आहे. देशात आजही तरुण पिढीला सावरकरांपासून प्रेरणा मिळते. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना वीर सावरकर काय आहेत हे माहित आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधींची भेट घ्यावी. त्यांना सावरकरांचे साहित्य अनुवादित करून भेट द्यावे. राहुल गांधी यांचा जो गैरसमज झाला आहे तो त्यातून दूर होईल, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - कळंबोलीत सात वर्षीय बालिकेचा विजेचा शॉक लागून मृत्यू

Intro:
महाराष्ट्रातील सरकार पाच वर्षे टिकेल

अजित पवार यांचे सरकार टिकविण्यात राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर महत्वाचे योगदान

राज्याच्या परताव्याच्या पैशावर पाकीटमारी करू नका

खासदार संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

रायगड : कोणीही मनातले मांडे खाऊ नये, स्वप्न पाहू नये, एखाद्या नेत्याने एका व्यक्तीवर बोलतो यावर सरकार टिकणार नाही. राज्यातील सरकार हे अन्न, वस्त्र निवारा, सामाजिक न्याय, आरोग्य, रोजगार, शिक्षा या विषयावर काम करते आहे. सावरकर यांचा विषय वेगळा आहे. त्यामुळे राज्यातील सरकार हे पाच वर्षे टिकेल. अजित पवार हेच हे सरकार पाच वर्षे टिकवतील. अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचे खंदे सहकारी म्हणून काम करतील. त्यांना राज्यातील प्रश्नांची जाण आहे. हे सरकार यशस्वी होऊन यशात मुख्यमंत्र्याबरोबर अजित पवार यांचे योगदान महत्वाचे राहील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली. यावेळी एनआरसी, अधिवेशन आणि सावरकर यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी सडेतोड उत्तरे पत्रकारांना दिली.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे अलिबाग येथील आगरसुरे या त्याच्या मूळगावी आले असता पत्रकारांनी भेट घेतली. त्यावेळी राज्यातील प्रश्नावर, सावरकर, एनआरसी या मुद्यावर पत्रकारांशी संवाद साधला

Body:
एनआरसीच्या पैशावर पाकिटमारी करू नका

केंद्र सरकारने एनआरसीचे 15 हजार 500 कोटी परतावा राज्य सरकारला दिला नसल्याने आर्थिक चणचण भासत आहे. हे राज्याचे पैसे आहेत. हे पैसे मिळाले नाही तर राज्यातील शेतकऱ्याच्या तोंडचा हक्काचा घास हिरावला आहे अशी आमची भूमिका राहील. राज्याला आज आर्थिक चणचण भासत आहे ती केंद्र सरकारच्या धोरणमुळे. केंद्र सरकारने घीसाड घाईने निर्णय घेतल्याने त्याचा त्रास इतर राज्याला सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राला 15 हजार 500 कोटी, पंजाबला साडेतीन हजार कोटी, केरळला दोन हजार सहाशे कोटी देणं लागत आहे. अनेक लहान राज्यांना या रकमा महत्वाच्या आहेत. चार महिन्यापासून परतावा दिलेला नाही आणि केंद्रात मौजमजा सुरू आहे. राज्यांना पैसे देणे महत्वाचे असताना त्यामध्ये पाकिटमारी करू नका असा टोला केंद्र सरकारला खासदार संजय राऊत यांनी मारला आहे.

देवेंद्र फडणवीस हे शहाणे आहेत

विदर्भात पहिलेच राज्याचे अधिवेशन होत आहे. त्यामुळे विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये. सरकारला किमान सहा महिने काम करू दिले पाहिजे. त्यानंतर विरोधकांनी बोलण्याचा अधिकार आहे. विरोधकांचा आकडा हा शंभर असला तरी सत्ताधारी यांचा आकडा 175 पर्यत पोहचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न इतर प्रश्नावर निर्णय घेत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुख्यमंत्री होते आणि आता विरोधी पक्षनेते आहेत. फडणवीस यांच्या कडून विधायक कामाची अपेक्षा आहे. ते शहाणे आहेत आणि विधानसभेत ते प्रचिती दाखवतील.Conclusion:अजित पवार यांच्यावर माझा पूर्ण विश्वास

अजित पवार यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून तेच सरकार टिकवतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील. सरकार पाच वर्षे टिकणार असून या यशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत अजित पवार यांचेही मोलाचे योगदान असेल. सावरकर यांच्या बाबतचे केलेल्या वक्त्याव्यवरून हे सरकार टिकणार नाही त्यांनाही संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचे साहित्य द्यावे

पंडित नेहरुवर नरेंद्र मोदी,भाजपचे लोक टीका करतात त्यावेळी आम्ही पंडित नेहरूंच्या बाजूने उभे राहतो. पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र चळवळीत योगदान हे ते राहणार तसेच सावरकर यांचेही योगदान राहणार. वीर सावरकर हे स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान यांचं दुसरं नाव सावरकर आहे. देशात आजही तरुण पिढीला सावरकरांपासून प्रेरणा मिळते. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना वीर सावरकर काय आहेत हे माहीत आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन भेट घ्यावी. सावरकरांचे साहित्य अनुवादित करून राहुल गांधी यांना भेट द्यावे. राहुल गांधी यांचा जो गैरसमज झाला आहे तो त्यातून दूर होईल अशी प्रतिक्रिया राऊत यांनी यावेळी दिली.
Last Updated : Dec 15, 2019, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.