रत्नागिरी - जिल्ह्यात मागील 24 तासांत जिल्ह्यात 462 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर मागील चोवीस तासात जिल्ह्यात 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 1 हजार 244 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आजपर्यंत 28 हजार 355 कोरोनाग्रस्त
आज (दि. 12 मे) आलेल्या आकडेवारीनुसार 462 नवे रुग्ण सापडले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 217 रुग्ण आरटीपीसीआर तर 245 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 28 हजार 355 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील 24 तासात 1244 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात 439 आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांपैकी तर 805 जण हे अँटीजेन टेस्ट केलेल्यांपैकी निगेटिव्ह आले आहेत.
12 जणांचा मृत्यू
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 856 एवढी झाली आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.01 टक्के आहे. आज जिल्ह्यात 863 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 22 हजार 885 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के आहे. जिल्ह्यात एकूण 4 हजार 814 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - रत्नागिरी : लोटे परिसरात अद्ययावत दोन कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत, सुप्रिया लाईफसेन्सचा पुढाकार