ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुततगती महामार्गावर टँकर पलटी; मळी सांडल्याने वाहतूक विस्कळीत

मळी घेऊन जाणारा टँकर पुणे मुंबई महामार्गावर पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला आहे. तर मळी सांडल्यामुळे महामार्गावरी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मुंबई-पुणे द्रुततगती महामार्गावर टँकर पलटी

author img

By

Published : May 30, 2021, 1:32 PM IST

खालापूर(रायगड)- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात मुंबईच्या दिशेने मळी घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने अनियंत्रित होऊन पुण्याकडे जाणाऱ्या विरुध्द दिशेच्या लेनवर हा टॅकर पलटी झाला. या अपघातामधे टँकरमधील मळी रस्त्यावर पसरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे.

महामार्गावर टँकर पलटी झालेल्या अपघाताची माहिती समजताच बोरघाट पोलीस, आयआरबीचे पथक व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी धावले. यावेळी देवदूत पथकाने जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत-

टँकर मधील गुळाची मळी पुणे लेनवर सांडल्याने पुणे बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. आयआरबी खोपोली नगरपरिषदेचे अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. रोडवर सांडलेल्या मळीमुळे इतर वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे आयआरबी आणि खोपोली नगरपालिकेकडील फायर ब्रिगेडच्या सहाय्याने पाणी मारून ती मळी हटविण्यात आली आहे. त्यानंतर साडे अकरा वाजताच्या सुमारास महामार्गाच्या तिन्ही लेनवरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.