ETV Bharat / state

कोरोना काळात मोदी लाट पूर्णपणे ओसरली - आमदार राजू पाटील - raju patil

कोरोना काळात मोदी लाट पूर्णपणे ओसरली असून मनसेची लाट येऊ लागली आहे. तर मला मनसे सैनिकांचा सार्थ अभिमान असून त्यांनी खऱ्या अर्थाने तळागाळात जाऊन कोरोना काळात गोरगरीबांना मदत करीत आपुलकीचा हात दिला. तसेच आपल्या पुढील काळात येणाऱ्या निवडणूका महत्त्वाच्या नसून गोरगरीबांच्या समस्या आमच्या कशा सुटतील यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असं राजू पाटील म्हणाले.

आमदार राजू पाटील
आमदार राजू पाटील
author img

By

Published : Jun 27, 2021, 9:50 AM IST

रायगड - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि राज्य महामार्गावर डिकसळ ते उमरोली येथे बसवण्यात आलेल्या स्वयंचलित सौर दिव्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच कल्याण ग्रामीण मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते 26 जून रोजी पार पडला.

पत्रकारांचा सन्मान..
कोरोना परिस्थितीत नैसर्गिक वादळे व आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी समाजात घडणाऱ्या गोष्टी जनतेसमोर आणल्याबद्दल सर्व पत्रकारांचा सन्मान यावेळी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कोरोना काळात मोदी लाट पूर्णपणे ओसरली..

कोरोना काळात मनसे सैनिकांचे कार्य उल्लेखनीय..

यावेळी आमदार राजू पाटील विचार व्यक्त करताना म्हणाले की, कोरोना काळात मोदी लाट पूर्णपणे ओसरली असून मनसेची लाट येऊ लागली आहे. तर मला मनसे सैनिकांचा सार्थ अभिमान असून त्यांनी खऱ्या अर्थाने तळागाळात जाऊन कोरोना काळात गोरगरीबांना मदत करीत आपुलकीचा हात दिला. तसेच आपल्या पुढील काळात येणाऱ्या निवडणूका महत्त्वाच्या नसून गोरगरीबांच्या समस्या आमच्या कशा सुटतील यावर जास्त लक्ष केंद्रित केले. आमदार पाटील पुढे बोलताना म्हणाले, की कर्जत नगरपालिकेत जरी आमचा एकच नगरसेवक असला तरी पुढे आमचा नगराध्यक्ष बसेल, कारण कोविड काळात मनसेने पुढे येऊन जनतेत उतरून काम केले आहे, त्यामुळे लोक मनसेला मदत करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला असून यावेळी जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख जे.पी.पाटील, खालापूर तालुकाध्यक्ष सचिन कर्णुक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.