ETV Bharat / state

जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार प्रशांत ठाकूर अर्ज भरण्यासाठी दाखल

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

आमदार प्रशांत ठाकूर
author img

By

Published : Oct 3, 2019, 4:41 PM IST

पनवेल - भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. पनवेलमध्ये जोरदारपणे शक्तीप्रदर्शन करून 'एकच वादा, प्रशांत दादा' असा नारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. या रॅलीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे वडील आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर हे देखील उपस्थित होते. प्रशांत ठाकूर यांच्या रॅलीत शिवसेना आणि आरपीआयचे कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - मिळेल त्याला गळाला लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- गिरीश महाजन

भाजप, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप जनसंपर्क कार्यालय येथून प्रशांत ठाकूर यांची ही रॅली काढण्यात आली. येथूनच ढोल-ताशे, लेझीम व बेंजोच्या निनादात भव्य रॅली सुरू झाली. जागो-जागी महिला भगिनींनी औक्षण करून फुलांचा वर्षाव केला. सकाळपासूनच संपूर्ण शहर प्रशांतमय झाले आहे. पनवेल मतदारसंघातून प्रशांत ठाकूर दुसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत.

Intro:सोबत व्हिडीओ जोडला आहे
पनवेल

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पनवेलमध्ये तुफान गर्दी जमली. पनवेलमध्ये जोरदारपणे शक्तीप्रदर्शन करून 'एकच वादा, प्रशांत दादा' असा नारा दिला. या रॅलीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे वडील आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर हे देखील आहेत. प्रशांत ठाकूर यांच्या रॅलीत शिवसेना आणि आरपीआयचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.

Body:भाजपा, शिवसेना, आर. पी. आय. (आ) महायुतीतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघातून पनवेल येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथून प्रशांत ठाकूर यांची ही रॅली काढण्यात आली. येथूनच ढोल-ताशे, लेझीम व बेंजोच्या निनादात भव्य रॅली सुरू झाली. जागो-जागी महिला भगिनींनी औक्षण करून फुलांचा वर्षाव केला. सकाळपासूनच संपूर्ण शहर प्रशांतमय झाले आहे. पनवेल मतदार संघातून प्रशांत ठाकूर दुसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. Conclusion:यावरून आमदार ठाकूर यांच्या ताकदीचा अंदाज येतो. भाजप-शिवसेना युती झाली अथवा नाही झाली तरी मतदारसंख्येच्या दृष्टीने राज्यात सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या पनवेलचा निकाल स्पष्ट आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.