ETV Bharat / state

रायगडमध्ये  शिवसेनेच्या भरत गोगावलेंना मिळाला एबी फॉर्म; इतर मतदारसंघातील इच्छुकांमध्ये धाकधूक

महाडचे आमदार भरत गोगावले यांना तिसऱ्यांदा शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचा सामना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्याबरोबर पुन्हा एकदा रंगणार आहे. तर जिल्ह्यातील इतर सहा मतदारसंघात अजूनही एबी अर्ज शिवसेनेतर्फे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.

author img

By

Published : Sep 30, 2019, 12:56 PM IST

रायगडमध्ये शिवसेना इच्छुकांमध्ये धाकधूक

रायगड - नवरात्रोत्सवात घटस्थापनेचा मुहूर्त साधून शिवसेनेतर्फे संभाव्य उमेदवारांना एबी अर्जाचे वाटप करण्यात आले. अद्याप भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली नाही तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना एबी अर्ज दिले आहेत. यात जिल्ह्यात महाडचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांना पुन्हा एबी अर्ज देण्यात आला. तर उरणचे विद्यमान आमदार मनोहर भोईर तसेच पेण, अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत याठिकाणच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मात्र धाकधूक सुरू झालेली आहे.

हेही वाचा - पुण्यात पावसाचे थैमान; चारचाकी गेली वाहुन, कार चालकाचा मृत्यू

महाडचे आमदार भरत गोगावले यांना तिसऱ्यांदा शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचा सामना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्याबरोबर पुन्हा एकदा रंगणार आहे. तर जिल्ह्यातील इतर सहा मतदारसंघात अजूनही एबी अर्ज शिवसेनेतर्फे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.

हेही वाचा - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल, पिके बुडण्याच्या मार्गावर...

अलिबाग विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे हे दोन जण इच्छुक आहेत. भाजपाने जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, उरण हे मतदारसंघ मागितले आहेत. मात्र, अद्यापही युतीची घोषणा अधिकृतपणे झालेली नाही. त्यामुळे अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, उरणमधून भाजपच्या इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे.

हेही वाचा - पुण्यात आलेला पूर हा अनधिकृत बांधकामांमुळेच - चंद्रकांत पाटील

कर्जत, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने येथील उमेदवारी कोणाला मिळणार याकडे इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर शिवसेनेकडून जिल्ह्यात एकाच जागेवर एबी अर्ज दिल्याने इतर मतदारसंघातील इच्छुक उमेदवार देव पाण्यात घेऊन बसले आहेत.

Intro:जिल्ह्यात महाडचे विद्यमान आमदार भरत गोगावले याना दिला एबी अर्ज

अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, पेण मधील शिवसेनेचे इच्छुक मात्र गॅसवर

रायगड : नवरात्रोत्सव घटस्थापनेचा मुहूर्त साधून शिवसेनेने संभाव्य उमेदवारांना एबी अर्जाचे वाटप करण्यात आले. युती अद्याप झालेली नसली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना एबी अर्ज दिले आहेत. रायगड जिल्ह्यात महाडचे विद्यमान आमदार भरत गोगावले याना एबी अर्ज दिला आहे. उरणचे विद्यमान आमदार मनोहर भोईर तसेच पेण, अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत याठिकाणच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मात्र धाकधूक सुरू झालेली आहे.Body:महाडचे आमदार भरत गोगावले यांना तिसऱ्यांदा शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचा सामना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्याबरोबर पुन्हा एकदा रंगणार आहे. जिल्ह्यातील इतर सहा मतदारसंघात अजूनही एबी अर्ज शिवसेनेतर्फे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.Conclusion:अलिबाग विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, सह संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे हे दोन जण इच्छुक आहेत. भाजपाने जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, उरण हे मतदारसंघ मागितले आहेत. मात्र अद्यापही युतीची घोषणा अधिकृतपणे झालेली नाही. त्यामुळे अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, उरण मधून भाजपच्या इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे.

कर्जत, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने येथील उमेदवारी कोणाला मिळणार याकडे इच्छुक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेकडून जिल्ह्यात एकाच जागेवर एबी अर्ज दिल्याने इतर मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मात्र देव पाण्यात घेऊन बसले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.