ETV Bharat / state

माणगावमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २० जणांना अटक

author img

By

Published : Sep 2, 2020, 10:29 PM IST

विंचवली परिसरात सुरु असणाऱ्या जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांनी छापा टाकत २० जणांना अटक केली आहे. जुगार खेळणाऱ्याकडून एकूण ५ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

mangaon police station
माणगाव पोलीस ठाणे

रायगड- माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचवली परिसरातील एका बंद घरामध्ये अनधिकृतपणे सुरू असलेला जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांनी छापा टाकला आहे. आज(बुधवार) पहाटे ४ वाजता केलेल्या धडक कारवाईत २० जणांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि वाहने असा ५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचवली परीसरातील एका बंद घरामध्ये अनाधिकृतपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रायगड पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी बंद घरामध्ये काही व्यक्ती हे तीन पत्ते जुगाराचे डाव खेळत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. छाप्यामध्ये एकूण २० आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा-राज्यभरात विजेच्या मागणीत वाढ, ऊर्जामंत्री राऊत यांची माहिती

आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह एकूण ३ लाख ७६ हजार ३२० रुपयांची रोख रक्कम तसेच एकूण १२ वाहनांसह ५ लाख ७३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद,पोलीस निरीक्षक रामदास इंगवले ,पोलीस निरीक्षक आर.एम.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राखीव पोलीस निरीक्षक शेख, पोलीस कॉन्स्टेबल आर.व्ही.चाळके,आर. जी.मार्कडे यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यु.एम.सुर्वे करत आहेत.

गणेशोत्सव काळात जुगार अड्डा चालवणाऱ्यां विरुद्ध कारवाई करण्याबाबत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. रायगड जिल्ह्यात कोठेही बेकायदेशीरपणे जुगार खेळला जात असल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास अथवा जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास तात्काळ कळवावे, असे आवाहन रायगड पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.