ETV Bharat / state

सततच्या भांडणाला कंटाळून नातवाने केला आजीचा खून; ४ जणांना अटक - ambiwali grandmother murder

४ मार्चला द्रोपदी पवार आणि रुपेश यांच्यात वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या रुपेशने अंगणात असलेल्या फरशीने आजीच्या डोक्यात वार करून तिला ठार मारले. त्यानंतर रुपेश तसेच रमेश पवार (वय.५५) सुधीर मोहिते व श्रीकांत मोहिते (रा.आंबिवली) यांनी परस्पर गुपचूपरित्या द्रौपदी यांचा अंत्यविधी उरकून घेतला.

draupadi pawar murder ambiwali
प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 12, 2020, 4:44 PM IST

रायगड- आजीबरोबर सतत होत असलेल्या भांडणाला कंटाळून नातवाने आजीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ मार्चला महाड तालुक्यातील आंबिवली येथे घडली. आजीचा खून केल्यानंतर नातवाने गुपचूप आजीचा अंत्यविधी करून पुरावा नष्ट केला होता. मात्र, पोलीस तपासात घडलेला प्रकार समोर आला. याप्रकरणी महाड तालुका पोलिसांनी नातवासह अन्य तिघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आंबिवली येथील द्रौपदी पांडुरंग पवार (वय.७४) यांचे ४ मार्चला रात्री निधन झाले होते. त्यांच्यावर ५ मार्चला अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र, द्रौपदी यांचा अचानक मृत्यू झाल्याने गावात याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे, पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला, म्हणून याप्रकरणाची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक एन.एम. गवारे व उपनिरीक्षक महेश कुचेकर यांनी सदर प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. त्यात पोलिसांचा संशय खरा ठरला.

द्रौपदी पवार आणि त्यांचा नातू रुपेश जनार्दन पवार (वय.३३) याच्यात कायम वाद होत असत. ४ मार्चला द्रोपदी पवार आणि रुपेश यांच्यात पुन्हा वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या रुपेशने अंगणात असलेल्या फरशीने आजीच्या डोक्यात वार करून तिला ठार मारले. तसेच सदर घटनेची माहिती पोलीस ठाण्यात न देता रुपेश तसेच रमेश पवार (वय.५५) सुधीर मोहिते व श्रीकांत मोहिते (रा.आंबिवली) यांनी परस्पर गुपचूपरित्या द्रौपदी यांचा अंत्यविधी उरकून घेतला. याप्रकरणी पोलिसांनी रुपेश जनार्दन पवार, रमेश पवार, सुधीर मोहिते व श्रीकांत मोहिते यांना अटक केली आहे.

हेही वाचा- लॉकडाऊन: JSW च्या नवी मुंबई, वाशी, पनवेलच्या कर्मचाऱ्यांनी घरीच थांबावे...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.