ETV Bharat / state

महाड इमारत दुर्घटना : मुख्य आरोपी फारुक काझी याला सात दिवसांची पोलीस कोठडी

महाड इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी फारुक काझी याला आज महाड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने काझी याला 4 ते 11 सप्टेंबर अशी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फारुक काझी
फारुक काझी
author img

By

Published : Sep 4, 2020, 4:06 PM IST

रायगड : तारिक गार्डन दुर्घटनेतील मुख्य आरोपी फारुक काझी याला आज(शुक्रवार) महाड न्यायलायत हजर करण्यात आले होते. न्यायालयाने फारुक काझी याला 4 ते 11 सप्टेंबर अशी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्य आरोपी फारुक काझी याला सात दिवसाची पोलीस कोठडी

महाड इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी फारुक काझी यासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फारुक काझी हा फरार झाला होता. 31 ऑगस्टरोजी फारुक काझी याने माणगाव जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी 3 सप्टेंबर रोजी माणगाव सत्र न्यायालयात होणार होती. त्यानुसार काझी हा न्यायालयात हजर झाला होता.

माणगाव सत्र न्यायालयात सुनावणी पूर्वीच फारुक काझी शरणागती पत्करुन यालयात हजर झाला. पोलिसांना तपासात सहकार्य करिन असा अर्ज त्याने न्यायालयाला दिला होता. हा अर्ज मान्य करून आरोपी बांधकाम व्यवसायिक फारुक काझी याला न्यायालयाने पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आज फारुक काझी याला महाड न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, महाड इमारत दुर्घटनेच्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद हे करीत आहेत.

हेही वाचा - खानावची वेलटवाडी होणार हायटेक; आदिवासी कुटुंबांना बायो टॉयलेट, वायफायही मिळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.