रायगड - जिल्ह्यातील ७ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी हे विजयी झाले आहेत. पहिल्यांदाच विधानसभेत आमदार म्हणून आपले पाऊल टाकणार आहेत. सुभाष पाटील (शेकाप), मनोहर भोईर (शिवसेना), सुरेश लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), धैर्यशील पाटील (शेकाप) या विद्यमान आमदारांना घरीच बसावे लागले आहे.
हेही वाचा... कोकणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा; खोपोलीत घरावर कोसळले झाड
अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शेकाप अशी लढत झाली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष पाटील यांचे कडवे आव्हान शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी दुसऱ्यांदा पेलले होते. 2014 मध्ये महेंद्र दळवी यांचा 16 हजाराने पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून 32 हजाराने विजय संपादित केला.
हेही वाचा... श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे 37 हजाराचे मताधिक्य मिळवून खासदार म्हणून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या कन्या अध्यक्षा अदिती तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. एकतर्फी वाटणारी श्रीवर्धनची लढाई शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांच्यामुळे प्रतिष्ठेची केली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला यश संपादन करण्यास अपयश आले आणि अदिती तटकरे या 39 हजार मताने विजयी झाल्या. श्रीवर्धनवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत ठेवला. जिल्ह्यातून दुसरी महिला आमदार बनण्याचा मान अदिती तटकरे यांना मिळाला आहे.
हेही वाचा... रायगडात शेकापचा सुफडा साफ, काँग्रेसलाही नाही उघडता आले खाते
कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड आणि शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्यात लढत होती. सुरेश लाड यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे आधी जाहीर केले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते निवडणुकीत उभे राहिले. 2014 च्या निवडणुकीत महेंद्र थोरवे हे शेकापकडून निवडणूक लढले होते. त्यावेळी अवघ्या अडीच हजाराने त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी बाजी मारली असून विद्यमान आमदार सुरेश लाड यांचा 18 हजार मताने पराभव केला. त्यामुळे सलग तिसऱ्या वेळी निवडून न येण्याची कर्जत विधानसभेतील परंपरा कायम राहिली आहे.
हेही वाचा... मी आमदार म्हणून निवडून आलो नसलो, तरी नगरसेवक म्हणून माझा लढा सुरूच असणार- हरेश केणी
उरण विधानसभा मतदारसंघातील यावेळची निवडणूक ही उत्कंठा पूर्वक होऊन अटीतटीची झाली. शिवसेनेकडून विद्यमान आमदार मनोहर भोईर, शेकापकडून विवेक पाटील आणि भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी हे तीन तुल्यबळ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि शेकापचे विवेक पाटील या उमेदवारांना धूळ चारून 5908 मताने विजय खेचून आणला. उरण विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एक अपक्ष उमेदवार मतदारांनी निवडून दिला आहे.
हेही वाचा... रायगड : श्रीवर्धन मतदार संघातून अदिती तटकरे 38,783 मतांनी विजयी
अलिबाग महेंद्र दळवी, उरण महेश बालदी, कर्जत महेंद्र थोरवे यांनी विद्यमान आमदारांना पराभूत करून तर अदिती तटकरे यांनी आपला श्रीवर्धनचा गड राखून पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहेत