ETV Bharat / state

VIDEO: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजोबांच्या डोळ्यांदेखत कारचा चुराडा, ४ वर्षांच्या नातवासह मुलगी-जावई ठार

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर 1 जुलै रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. एका कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने कारला धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की, कारला आग लागली व त्यात आई-वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान जखमी कंटेनरचा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला..

express-way
express-way
author img

By

Published : Jul 3, 2021, 8:13 PM IST

Updated : Jul 7, 2021, 1:36 PM IST

रायगड - मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर एका कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. गुरुवारी (1 जुलै) सायकाळंच्या सुमारास मुंबई-पणे एक्सप्रेस वे वर आडोशी उतारावर झालेल्या या अपघातात एका कारचा चक्काचूर होऊन कार जळून खाक झाली. या कारमधील तिघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यात आई-वडील व तरुण मुलाचा समावेश होता.जोक्विन चेटियार ( वय 36), लुईझा चेटियार (वय 35) व डॅरिल चेटियार (वय 4) अशी मृतांची नावे असून हे सर्व नायगाव (मुंबई) येथील रहिवासी आहेत..

हेही वाचा- 'पप्पा, मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहून 20 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अपघाताचा थरार टँकरच्या रिअर कॅमेऱ्यात कैद -

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस वे वरील आडोशी तीव्र उतारावर कंटेनरने आयटेन कारला जोरदार धडक दिल्याने ती कार पुढच्या ट्रकवर धडकली व कारने पेट घेतला. दरम्यान त्याच कंटेनरने पुढील अजून एका कारला धडक देऊन अनियंत्रित होऊन रस्त्याखाली जाऊन उलटला. यात आयटेन कार जळून पूर्णपणे खाक झाली व यातील तीन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालकही गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा- CCTV Video कल्याण रेल्वे स्थानकात तरुणाची चाकूने वार करून हत्या

आई-वडील व मुलाचा मृत्यू -

या भीषण अपघाताची माहिती मिळताचा खोपोली पोलीस, एक्सप्रेस वरील बोरघाट व पळस्पे क्षेत्र वाहतूक पोलीस, आपत्कालीन यंत्रणा, डेल्टा फोर्स यांनी तातडीने मदत कार्य करून मृत व्यक्तींना वाहनातून बाहेर काढले. जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना करण्याची कामगिरी बजावली. तसेच महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सुमारे दीड तासानंतर मार्गावरील वाहतूक सुरुळीत झाली.

हेही वाचा- 'तालिबानी' शिक्षा! वडील आणि भावाकडून तरुणीला काठीने बेदम मारहाण

डॅरिल चेटियारचा एक जुलैलाच शाळेत इन्टरव्हूव -

अपघातातील लुईझा यांचे वडील जॉन रॉड्रिग्ज (रा.अंधेरी) यांची गाडीही त्याच्या मागेच होती. त्यांनी सांगितले की, आपल्या चार वर्षाच्या नातवाचा नायगावच्या डॉन बॉस्को शाळेमध्ये 1 जूलै रोजी ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला. पण एक आयुष्य सुरू होण्याच्या अगोदरच मृत्यूने त्याला कवटाळल्यामुळे आपल्या नातवाच्या आठवणीने त्यांना अश्रु अनावर झाले.

हेही वाचा- पप्पा, ऑफिसातून कधी येणार... चॉकलेट आणा... वडिलांचा कोरोनाने मृत्यू, तरीही चिमुकली दररोज ४ ते ५ वेळा करते वडिलांना फोन

घटनास्थळी पोलिस पाहणी करताना

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघातातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्याने अपघाताची तीव्रता पाहताना सर्वांचा थरकाप उडत असून ट्रकमधील चालक व सहकार्यांची नावे अदयाप उघड झाली नसून अपघाताचा थरार टँकरच्या रिअर कँमेऱ्यात कैद झाला आहे.

Last Updated : Jul 7, 2021, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.