ETV Bharat / state

पुनःश्च लॉकडाऊन : दहा दिवस गैरसोय टाळण्यासाठी तळीरामांची उडाली झुंबड - रायगड मद्यविक्री दुकान गर्दी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत दुसरे लॉकडाऊन घोषीत केले आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंसह मद्याची दुकानेही बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनची दोन दिवस अगोदरच प्रशासनाने कल्पना दिल्याने तळीरामांना मद्यसाठा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनेक ठिकाणी मद्याच्या दुकांनांवर गर्दी झाली.

Liquor Shop
मद्यविक्री दुकान
author img

By

Published : Jul 14, 2020, 3:44 PM IST

रायगड - जिल्ह्यात 15 ते 24 जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाले आहे. या काळात मद्याची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत त्यामुळे तळीरामांची पावले आपोआप मद्याच्या दुकानांकडे वळली आहेत. मद्याच्या दुकानावर दहा दिवसांचा मद्यसाठा खरेदी करण्यासाठी मद्यपींची झुंबड उडाली आहे. दहा दिवसांच्या बंद दरम्यानच गटारी सण येत असल्याने लोक अगोदरच सोय करुन ठेवत असल्याचे चित्र अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात दिसून आले.

10 दिवसांच्या लॉकडाऊन पार्श्वभूमीवर मद्यविक्री दुकांनांवर मद्यपींची गर्दी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 24 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत दुसरे लॉकडाऊन घोषीत केले आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंसह मद्याची दुकानेही बंद राहणार आहेत. पहिला लॉकडाऊन तातडीने जाहीर झाल्याने तळीरामांना मद्याचा साठा करण्यास वेळ मिळाला नव्हता. मात्र, दुसऱ्या लॉकडाऊनची दोन दिवस अगोदरच प्रशासनाने कल्पना दिल्याने तळीरामांना मद्यसाठा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनेक ठिकाणी मद्याच्या दुकांनांवर गर्दी झाली. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळत तर काही ठिकाणी नियम मोडत मद्यपींनी मद्य खरेदी केली.

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सणांना सुरुवात होणार असून 20 जुलैला तळीरामांचा आवडता गटारी सण आहे. मात्र, या काळात मद्याची दुकाने बंद राहणार आहे. त्यामुळे गटारी सण साजरा करण्यासाठी अगोदरच मद्यसाठा केला जात आहे.

दरम्यान, रायगडात पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार आहे. मेडिकल, दूध, फार्मा कंपनी तसेच इतर अत्यावश्यक कंपन्या सुरू राहणार असून काही कंपन्या बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहा दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला, मटण, चिकन, मासळी बाजार, किराणा दुकानेही बंद राहणार असून नागरिकांना होम डिलिव्हरीची सुविधा देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.