रायगड - आज 5 मे रोजी दारूची दुकाने उघडी होणार असल्याचे कळल्यावर तळीराम पहाटेपासूनच दुकानासमोर रांगा लावून उभे होते. दुकाने सुरू होताच आता दारू मिळणार, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. दरम्यान, दुकाने सुरू झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळत मद्यविक्री केली जात आहे.
जिल्ह्यात आज 5 मेपासून मद्यविक्री सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने पहाटेपासून दुकानासमोर भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत होत्या. प्रत्येक व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्य विक्री सुरू केली. यावेळी मद्य खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सॅनिटायझर लावूनच सोडत आहेत.