रायगड - अरबी समुद्रात क्यार चक्रीवादळ तयार झाले असून याचा फटका जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनारी बसला आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील हजारो मासेमारी बोटी समुद्रकिनारी विसावल्या आहेत. श्रीवर्धन समुद्रकिनारीही शेकडो मासेमारी बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत.
हेही वाचा... क्योर चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला धोका, अतिवृष्टीचाही इशारा
कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. क्यार चक्रीवादळाचा श्रीवर्धनच्या किनाऱ्याला फटका बसला असून अनेक बोटींमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांची धावाधाव सुरू झाली आहे. समुद्राचे पाणी घुसले असले तरी अद्याप तरी कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.
हेही वाचा... परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादनात घट... शेतकऱ्यांना आर्थिक फटका