खोपोली - खोपोली येथील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली ( Khopoli Chemical Company Fire ) आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 4 ते 5 किलोमीटर धुराचे लोट पसरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर असलेल्या खोपोली येथील अल्टा फार्मास्युटिकल कंपनीला आग लागली. या आगीत मेथॉल प्लांट आठ रियॅक्टर पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. ही आग एवढी भीषण होती की, धुराचे लोट चार ते पाच किलोमीटर अंतरावर पसरले. या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच, खोपोली नगरपालिका, अलाना कंपनीच्या अग्नीशमन दलाने कमी वेळात आगीवर नियंत्रण आणले आहे.
हेही वाचा - NCP Allegation PM Modi : मोदींनी आपल्या पदाचा मान राखला नाही, राष्ट्रवादीची पंतप्रधानावर टीका