ETV Bharat / state

क्षुल्लक कारणावरून दोन गटात खांदेरी किल्ल्यावर हाणामारी, अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Raigad Police News

फोन लावण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या क्षुल्लक वादातून दोन गटात हाणामारी झाली. अलिबाग पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

khanderi-fort-two-groups-are-attacked
क्षुल्लक कारणावरून दोन गटात खांदेरी किल्यावर हाणामारी
author img

By

Published : Dec 10, 2019, 11:43 PM IST

रायगड - फोन लावण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात प्रचंड हाणामारी झाल्याची घटना रविवारी 8 डिसेंबरला सायंकाळी खांदेरी किल्यावर घडली. या हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाले असून त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्षुल्लक कारणावरून दोन गटात खांदेरी किल्यावर हाणामारी

अलिबाग समुद्रात असलेल्या खांदेरी किल्ल्यावर मुंबई येथून पन्नास ते साठ जणांचा एक ग्रुप सहलीसाठी आला होता. त्याचवेळी आक्षी येथील तीस ते चाळीस जणही सहलीसाठी आले होते. खांदेरी किल्ल्यात असलेल्या वेताळ देवाला मान देण्यासाठी आक्षीतील तरुणाई गेली होती. मान दिल्यानंतर आक्षीकर आणि मुंबईतील पर्यटक हे वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास बसले होते. यावेळी आक्षी मधील एकाने मुंबईच्या पर्यटकांकडे फोन करण्यासाठी मोबाईलची मागणी केली. त्यावेळी मुंबईतील पर्यटकाने त्याला नंबर सांग फोन लावतो असे सांगितले. याचा राग आक्षीकर व्यक्तीला आला आणि त्याने मुंबईच्या पर्यटकांचा मोबाईल पाण्यात फेकला. त्यावरून बाचाबाची दोन्ही गटात झाली. मात्र, काही वेळाने सर्व शांत झाले.

सायंकाळी मुंबईतील पर्यटक जाण्यास निघाले असता त्यातील एकाने 'निघतो भावांनो' असे बोलला. यावर आक्षीतील तरुणांनी अपशब्द वापरल्याने दोन्ही गटात धुमश्चक्री मारामारी झाली. दोन गटात झालेल्या या मारहाणीत दोन्ही कडचे जखमी झाले आहेत. अलिबाग पोलिसांना ही घटना कळताच तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही गटावर गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीत जखमी झालेल्यावर मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किल्ल्यावर मद्यप्राशन करणे कितपत योग्य -

अलिबाग समुद्र हद्दीत असलेल्या खांदेरी किल्ल्यावर मद्यप्राशन करून झालेली ही मारामारी घटना निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले हे ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यामुळे त्याचे पवित्र येणाऱ्या पर्यटकांनी राखणे गरजेचे आहे. त्यामुळे किल्ल्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांना बंदी घालणे व असे कृत्य करणाऱ्यांवर कायद्याचा जरब बसवण्याची मागणी जोर धरत आहे.

Intro:क्षुल्लक कारणावरून दोन गटात खांदेरी किल्यावर हाणामारी

अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रायगड : फोन लावण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात प्रचंड हाणामारी झाल्याची घटना रविवारी 8 डिसेंबर रोजी सायंकाळी खांदेरी किल्यावर घडली. या हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाले असून त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Body:अलिबाग समुद्रात असलेल्या खांदेरी किल्यावर मुंबई येथून पन्नास ते साठ जणांचा एक ग्रुप सहलीसाठी आला होता. त्याचवेळी आक्षी येथील तीस ते चाळीस जणही सहलीसाठी आले होते. खांदेरी किल्यात असलेल्या वेताळ देवाला मान देण्यासाठी आक्षीतील तरुणाई गेली होती. मान दिल्यानंतर आक्षीकर आणि मुंबईतील पर्यटक हे वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास बसले होते. यावेळी आक्षी मधील एकाने मुंबईच्या पर्यटकांकडे फोन करण्यासाठी मोबाईलची मागणी केली. त्यावेळी मुंबईतील पर्यटकाने त्याला नंबर सांग फोन लावतो असे सांगितले. याचा राग आक्षीकर इसमाला आला आणि त्याने मुंबईच्या पर्यटकांचा मोबाईल पाण्यात फेकला. त्यावरून बाचाबाची दोन्ही गटात झाली. मात्र काही वेळाने सर्व शांत झाले.

सायंकाळी मुंबईतील पर्यटक हे जाण्यास निघाले असता त्यातील एकाने 'निघतो भावांनो' असे बोलला. यावर आक्षीतील तरुणांनी अपशब्द वापरल्याने दोन्ही गटात धुमश्चक्री मारामारी झाली. दोन गटात झालेल्या या मारहाणीत दोन्ही कडचे जखमी झाले आहेत. अलिबाग पोलिसांना ही घटना कळताच तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही गटावर गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीत जखमी झालेल्यावर मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

--------------------

Conclusion:किल्यावर मद्यप्राशन करणे कितपत योग्य

अलिबाग समुद्र हद्दीत असलेल्या खांदेरी किल्यावर मद्यप्राशन करून झालेली ही मारामारी घटना निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले हे ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यामुळे त्याचे पवित्र येणाऱ्या पर्यटकांनी राखणे गरजेचे आहे. त्यामुळे किल्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांना बंदी घालणे व असे कृत्य करणाऱ्यांवर कायद्याचा जरब बसविण्याची मागणी जोर धरत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.