ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळात घराचे नुकसान झालेल्या महिलेला खालापूर पोलिसांनी केली मदत - raigad police news

तौक्ते चक्रीवादळात एका महिलेच्या घरावरील पत्रे उडून गेले होते. त्यांना खालापूर पोलिसांनी 36 सिमेंटचे पत्रे मदत केली आहे.

पत्रे देताना
पत्रे देताना
author img

By

Published : May 23, 2021, 3:51 PM IST

Updated : May 23, 2021, 4:21 PM IST

रायगड - तौक्ते चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्याला बसल्याने यामध्ये अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाला असून जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील काही घरांचे या तौक्ते वादळामुळे मोठा नुकसान झाले. अनेक घरांच्या भिंतीची पडझड होऊन अनेकांची पत्रे व कौले चक्रिवादळात उडून गेल्याने असंख्य गोरगरीब कुटुंबासमोर कोरोनासमवेत नवे संकट उभे राहिले आहे. असेच अष्टविनायक क्षेत्र महाड गावातील एका विधवा महिलेच्या घरावरील छप्पर वादळात उडून गेले होते. या विधवा महिलेसमोर संकट उभे असताना या संकट काळात खालापूर पोलीस धावून येत मदत केली. या महिलेला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला व खालापूरचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांच्या हस्ते 36 सिमेंटचे पत्रे देण्यात आले. खालापूर पोलिसांच्या या कामगिरी कौतुक होत असून खालापूर पोलिसांचा माणुसकीचा झरा वाहताच असल्याचे पाहायला मिळत आहेत.

तौक्ते चक्रीवादळात घराचे नुकसान झालेल्या महिलेला खालापूर पोलिसांनी केली मदत

कोरोना काळात खालापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

कोरोना काळात खालापूर तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. याच काळात हजारो गोरगरिब कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच पाच गावे दत्तक घेत खालापूर पोलिसांनी आपल्या सामाजिक कार्याची छाप संपूर्ण रायगड जिल्ह्यात पाडली. नुकताच तौक्ते वादळाने खालापूर तालुक्यातील काही ग्रामीण भागातील कुटुंबाचे नुकसान केल्याने काही कुटुंबावर नवे संकट उभे राहिले असता याकाळात असंख्य कुटुंबाना खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा हात देण्यात आला.

खालापूर पोलिसांनी केलेली मदत मी कधापी विसणार नाही - छबीबाई दिसले

तौक्ते वादळाने महाड गावातील छबीबाई दिसले या विधवा महिलेच्या घरावरचे पत्रे उडून गेल्याने ही महिला छप्पर मिळेल का या चिंतेत सापडली असता या महिलेल्या मदतीला खालापूर पोलीस ठाण्यातील पोलीस धावून आले. त्यानंतर छबीबाई दिसले यांनी पोलिसांचे आभार मानले.

याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला व खालापूरचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते, पोलीस शिपाई घवास हे उपस्थित होते.

हेही वाचा - 'पंतप्रधान मोदींच्या अहंकारामुळेच देश स्मशान बनला आहे'

Last Updated : May 23, 2021, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.