पेण (रायगड )- कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता आरोग्य व्यवस्था सुसज्ज करणे ही महत्वाचे आहे. यासाठी पेण आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार जेएसडब्लू कंपनीने आपली सामाजिक बांधिलकी जपत किमान 20 लाख खर्च करून 50 खाटांचे स्वतंत्र विलगिकरण कक्ष बांधून पेण उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आले.
यासाठी कंपनीने लॉकडाऊनच्या स्थितीतही सामानाची जुळवा जुळव 5 दिवसात बांधकाम काम वेळेत पूर्ण केले. तयार केलेले विलगिकरण कक्ष कंपनीचे अधिकारी नारायण बोलबंडा, आत्माराम बेटकेकर, कुमार थत्ते यांनी पेण हॉस्पिटलचे सहाययक अधीक्षक रमेश गिरके, डॉक्टर अनुज दोषी यांना सुपूर्द केले.
पेण तालुक्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. तरीही येणाऱ्या भविष्यात जर असे प्रथम अवस्थेतील संशयित रुग्ण आढळून आले तर, अशा रुग्ण संख्येचा विचार करून पेण तालुक्यात कोरोना संशयितांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे व ही काळाची गरज असल्यामुळे, जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून स्वखर्चाने पेण उपजिल्हा रुग्णालय येथे 50 बेडचे विलगिकरण कक्ष करून देण्यात आले आहे.