नवी मुंबई - नुसती आश्वस्त करून, त्यांची कोणत्याही प्रकारची पूर्ती न केल्याने जेएनपीटी प्रकल्पग्रस्त मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे जेएनपीटी प्रकल्पबाधित आता समुद्रात उतरून बेमुदत आंदोलन छेडणार आहेत. जेएनपीटी प्रकल्पग्रस्त आंदोलक आपल्या मागण्यांसाठी समुद्रात होड्या आडव्या करून, जेएनपीटी बंदरातील आंतराष्ट्रीय जलवाहतुकीशी संबंधित जहाजे रोखणार आहेत. 21 जानेवारी पासून या बेमुदत आंदोलनाची सुरुवात होणार आहे.
1985 साली जेएनपीटी बंदराचा विकास करताना झाली अनेक कुटूंब विस्थापित-
जेएनपीटी बंदराचा विकास 1985 साली करताना अनेक कुटुंब विस्थापित झाली. या कुटुंबाच पुनर्वसन करण्यासाठी 17 हेक्टर जागा देण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात 2 हेक्टर जागेवर तुटपुंज्या सुविधा देऊन जेएनपीटीकडून बोळवण करण्यात आली. मात्र अशा या अर्धवट पुनर्वसनाविरोधात प्रकल्प बाधितांनी आता ऐतिहासिक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.
21 तारखेला जेएनपीटीत बोटी रोखणार; प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन
प्रकल्पग्रस्त कुटुंबाच पुनर्वसन करण्यासाठी 17 हेक्टर जागा देण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात 2 हेक्टर जागेवर तुटपुंज्या सुविधा देऊन जेएनपीटीकडून बोळवण करण्यात आली. मात्र अशा या अर्धवट पुनर्वसनाविरोधात प्रकल्प बाधितांनी आता ऐतिहासिक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.