ETV Bharat / state

झिराड गावात जिल्ह्यातील पहिली डिजिटल ग्रामपंचायत - Grampanchayat

या अॅप्लिकेशनमध्ये झिराड ग्रामपंचायत, परिसरातील शाळा, महाविद्यालय, महत्त्वाचे मोबाईल नंबर, शासनाच्या योजना, शेती मालाचा बाजारभाव, हवामान याविषयी माहती दिली आहे. ग्रामपंचायत दवंडी, डिजिटल जाहिराती या सुविधा ग्रामस्थांना अॅप्लिकेशनमधून मिळणार आहेत.  तसेच या माध्यमातून एका क्लिकवर प्रत्येक माहिती ग्रामस्थांना प्राप्त होणार आहे.

RAIGAD
author img

By

Published : Feb 15, 2019, 11:21 AM IST

रायगड - राज्य शासनाने डिजिटल माध्यमाचा वापर करत 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना राबवली आहे. या अंतर्गत अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीने डिजिटल ग्रामपंचायत उपक्रमात 'घरोघरी डिजी ग्राम' हे अॅप्लिकेशन तयार केले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. झिराड ग्रामपंचायत डिजिटल अॅप्लिकेशन बनवणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी २ महिन्यांपूर्वी दर्शना भोईर या निवडून आल्या होत्या. भोईर यांनी गुरुवारी झिराड ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला. त्यानिमित्ताने 'ग्रामपंचायत घरोघरी' या मोबाईल अॅप्लिकेशनचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी आमदार पंडित पाटील, चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतमधून ग्रामस्थांना लागणारे दाखले मिळताना अनेकवेळा अडचणी येतात. तसेच शासनाच्या अनेक योजनांची ग्रामस्थांना माहिती नसते. यातूनच झिराड गावातील तरुण सचिन भोईर यांनी डिजिटल अॅप्लिकेशन तयार करण्याची संकल्पना सरपंच दर्शना भोईर यांच्याकडे मांडली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दिलीप भोईर यांनी पुढाकार घेतला.

पुणे येथील रिफॉरमिस्ट आयटी सोल्युशन प्रा. लि. कंपनीने हे मोबाईल अॅप्लिकेशन बनवले आहे. यासाठी साधारण ५० हजार रुपये खर्च आला. हे अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅप्लिकेशनमध्ये झिराड ग्रामपंचायत, परिसरातील शाळा, महाविद्यालय, महत्त्वाचे मोबाईल नंबर, शासनाच्या योजना, शेती मालाचा बाजारभाव, हवामान याविषयी माहती दिली आहे. ग्रामपंचायत दवंडी, डिजिटल जाहिराती या सुविधा ग्रामस्थांना अॅप्लिकेशनमधून मिळणार आहेत. तसेच या माध्यमातून एका क्लिकवर प्रत्येक माहिती ग्रामस्थांना प्राप्त होणार आहे

undefined

झिराड ग्रामपंचायत झाली जिल्ह्यातील पहिली डिझिटल ग्रामपंचायत, डिजी ग्राम अप्लिकेशनचे झाले लोकार्पण

रायगड : शासन आपल्या दारी ही संकल्पना डिझिटल माध्यमातून राज्य शासनाने राबवली आहे. अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीने डिझिटल ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामपंचायत घरोघरी डिजी ग्राम हे अप्लिकेशन तयार केले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. झिराड ग्रामपंचायतीला डिजीटल ग्रामपंचायत बनण्याचा पहिला बहुमान जिल्ह्यात मिळाला आहे. या अप्लिकेशनमुळे झिराड ग्रामस्थांना आता घर बसल्या आपली कामे एका क्लिकवर करता येणार आहेत.
     दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर झिराड ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी दर्शना भोईर निवडून आल्या होत्या. दर्शना भोईर यांनी आज झिराड ग्रामपंचायतीचा आज पदभार स्वीकारला. त्यानिमित्ताने ग्रामपंचायत घरोघरी या मोबाईल अप्लिकेशनचे लोकार्पण केले. यावेळी आमदार पंडित पाटील, चित्रलेखा पाटील, राजीप सदस्य दिलीप भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायतमधून ग्रामस्थांना लागणारे दाखले मिळताना अनेकवेळा अडचणी येत असतात. तसेच शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना माहिती नसते. यातूनच झिराड गावातील तरुण सचिन भोईर यांनी ग्रामपंचयतीचे डिझिटल अप्लिकेशन तयार करण्याची संकल्पना सरपंच दर्शना भोईर यांच्याकडे मांडली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी दिलीप भोईर यांनी पुढाकार घेतला.
पुणे येथील रिफॉरमिस्ट आयटी सोल्युशन प्रा. लि. कंपनीने हे मोबाईल अप्लिकेशन एक महिन्यात बनविले आहे. यासाठी साधारण पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. सदरचे अप्लिकेशन हे गुगल प्ले स्टोअरवरून नागरिकांना घेता येणार आहे. या मोबाईल अप्लिकेशनमध्ये झिराड ग्रामपंचायतीची माहिती, परिसरातील शाळा, महाविद्यालय याची माहिती, महत्वाचे मोबाईल नंबर, शासनाच्या योजना तसेच शेतकऱ्यांसाठी लागणारी शेती मालाबाबत बाजारभाव, हवामान याची माहिती, ग्रामपंचायत दवंडी बाबतची माहिती, डिझिटल जाहिराती या सुविधा ग्रामस्थांना या मोबाईल अप्लिकेशन मार्फत मिळणार आहेत.
ग्रामपंचायत डिझिटल मोबाईल अप्लिकेशनमुळे झिराड ग्रामपंचायत आता ग्रामस्थांना घरात पोहचली असून एका क्लिकवर प्रत्येक माहिती ग्रामस्थांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे डिझिटल ग्रामपंचायत अप्लिकेशन बनविणारी झिराड ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.