ETV Bharat / state

पेण तालुक्यात रिमझिम पावसात स्वातंत्र्य दिन साजरा

author img

By

Published : Aug 15, 2021, 7:52 PM IST

पेण तालुक्यात देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक प्रशालांसह कॉलेज, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाचे संकट असूनही पहाटेपासून सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. राष्ट्रीय सणाला वरुण राजानेसुद्धा रिमझिम हजेरी लावली होती.

पेण तालुक्यात रिमझिम पावसात स्वातंत्र्य दिन साजरा
पेण तालुक्यात रिमझिम पावसात स्वातंत्र्य दिन साजरा

रायगड (पेण) - सकाळपासून रिमझिम पडणाऱ्या पावसात पेण तालुक्यात देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक प्रशालांसह कॉलेज, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाचे संकट असूनही पहाटेपासून सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. राष्ट्रीय सणाला वरुण राजानेसुद्धा रिमझिम हजेरी लावली होती.

देशभक्तीपर गीते

पेण पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस कार्यालय, महात्मा गांधी मंदिर, पेण नगरपरिषद, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, पेण तहसील कार्यालय, दादर सागरी पोलीस ठाणे येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते झाली. विद्यार्थ्यांची भाषणे, गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाले. एकूणच पेणमध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्याक आले

पेण तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांच्या हस्ते, पेण पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक गौरी प्रसाद हिरेमठ यांच्या हस्ते, दादर सागरी पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या हस्ते, पेण नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते, भाऊसाहेब नेने महाविद्यालयात बापू बोरसे वरिष्ठ लिपिक यांच्या हस्ते, महात्मा गांधी ग्रंथालय वाचनालय येथे आप्पा सत्वे यांच्या हस्ते रिमझिम पावसात ध्वजारोहण करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.