ETV Bharat / state

'राजकारणात एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला दिलेला शब्द पाळणे ही सर्वात मोठी गोष्ट' - रायगड मनसे

एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला दिलेला शब्द पाळणे ही सर्वात मोठी गोष्ट असून राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड हे माझ्यासाठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहे, अशी भावना मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Karjat Municipal Council
Karjat Municipal Council
author img

By

Published : Apr 28, 2021, 7:30 PM IST

Updated : Apr 28, 2021, 7:44 PM IST

रायगड - एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला दिलेला शब्द पाळणे ही सर्वात मोठी गोष्ट असून राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड हे माझ्यासाठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहे, अशी भावना मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. कर्जत नगरपरिषदेत आज स्वीकृत नगरसेवकपदी मनसेचे हेमंत ठाणगे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ते बोलत होते.

शिवसेनेकडे बहुमत असतानाही शिवसेनेकडून अर्ज भरला नाही -

कर्जत नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक धनंजय दुर्गे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द केल्याने रिक्त जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात आली होती. या जागेवर मनसेचे हेमंत सूर्याजी ठाणगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ठाणगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कर्जत नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक निवडणूक

यावेळी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेत पदनिर्देशित अधिकारी म्हणून कर्जत उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी काम पाहिले. कर्जत नगरपरिषदेत नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी देखील ठाणगे यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी हेमंत ठाणगे व मनसेच्या वरिष्ठानी आपल्या मित्र पक्षाची राष्ट्रवादी भवन येथे भेट घेतली.

तर यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी ठाणगे यांचे अभिनंदन करत तालुक्यात होत असलेले राजकारण कुस बदलत असल्याचे म्हटले.

तसेच याप्रसंगी कर्जत नगरपरिषदेचे गट नेते शरद लाड, राजेश लाड, मनसे कर्जत शहराध्यक्ष समीर चव्हाण, उपतालुका अध्यक्ष विलास डुकरे, महिला शहर उपाध्यक्ष आकांक्षा शर्मा उपस्थित होते.

Last Updated : Apr 28, 2021, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.