रायगड - आज पहाटेच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पावसाअभावी करपू लागलेल्या भातरोपांनाही जीवदान मिळाले आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात अलिबागसह पेण, नागोठणे, कोलाड, पाली परिसरात पहाटे 3 वाजताच्या सुमारास पाऊस झाला. तासभर बरसल्यानंतर पावसाने उघडीप घेतली आहे.
जिल्ह्यात वायू चक्रीवादळामध्ये आठवडाभर पावसाने दमदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडत असल्या, तरी काही वेळातच ऊन पडायला सुरुवात होते.
आज पहाटे उत्तर भागात पावसाने पहाटे सुरुवात केली असून काही प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र पुन्हा पाऊस थांबला असला, तरी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.