ETV Bharat / state

विजांच्या कडकडाटासह पनवेलमध्ये जोरदार पाऊस; नागरिकांना दिलासा

रात्रीच्या सुमारास बरसलेल्या पावसाने सर्वांचीच धांदल उडाली. अनेक गावांत वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. अक्षरश: धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे विजेच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत थैमान सुरूच होते. कडक उन्हासोबत उकाड्याने अंगाची लाही-लाही होत होती. अचानक सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात बदल झाला. त्यानंतर विजेचा कडकडाटसह वादळी वाऱ्याने हजेरी लावली.

विजांच्या कडकडाटासह पनवेलमध्ये जोरदार पाऊस
author img

By

Published : Jun 11, 2019, 7:43 AM IST

Updated : Jun 11, 2019, 8:31 AM IST

पनवेल - विजांच्या कडकडाटसह पनवेलमध्ये सोमवारी जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या पनवेलकरांना दिलासा मिळाला आहे.

विजांच्या कडकडाटासह पनवेलमध्ये जोरदार पाऊस

रात्रीच्या सुमारास बरसलेल्या पावसाने सर्वांचीच धांदल उडाली. अनेक गावांत वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. अक्षरश: धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे विजेच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत थैमान सुरूच होते. कडक उन्हासोबत उकाडय़ाने अंगाची लाही-लाही होत होती. अचानक सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात बदल झाला. त्यानंतर विजेचा कडकडाटसह वादळी वाऱ्याने हजेरी लावली.

कोणी पहिल्या पावसात मनसोक्त भिजून तर कोणी मस्त गरमा गरम चहा आणि भजी-वडापाववर ताव मारून पावसाचा आनंद लुटला. पावसाचा जोर इतका होता की काही क्षणांतच अनेक भागांत पाणी तुंबले. त्यामुळे पहिल्याच पावसाने सिडकोच्या भोंगळ कारभाराची पोलखोल केली आहे. तर कामोठेमध्ये पहिल्याच पावसाने वीज यंत्रणा कोलमडली होती. वातावरणात गारवा आल्याने नागरिक काहीसे सुखावले आहेत. दरम्यान, पनवेलमधील हवामान २९ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.

Intro:
पनवेल

बातमीला व्हिडीओ सोबत जोडला आहे.

विजांच्या कडकडाटसह पनवेलमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. उष्णतेने हैराण झालेल्या पनवेलकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.Body:रात्रीच्या सुमारास बरसलेल्या पावसाने सर्वाचीच धांदल उडाली. अनेक गावांत वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. अक्षरश: धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे विजेच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत थमान सुरूच होते. कडक उन्हासोबत उकाडय़ाने अंगाची लाही-लाही होत होती. अचानक सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात बदल झाला. विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्याने हजेरी लावली. कोणी पहिल्या पावसात मनसोक्त भिजून तर कोणी मस्त गरमा गरम चहा अन् भजी-वडापाववर ताव मारुन पावसाचा आनंद लुटला. पावसाचा जोर इतका तुफान होता की काही क्षणांतच अनेक भागात पाणी तुंबले. त्यामुळे पहिल्याच पावसाने सिडकोच्या भोंगळ कारभाराची पोलखोल केली आहे.Conclusion:कामोठेमध्ये पहिल्याच पावसाने वीज यंत्रणा कोलमडली होती. वातावरणात गारवा आल्याने नागरिक काहीसे सुखावले आहेत.
दरम्यान पनवेलमधील हवामान 29 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे.
Last Updated : Jun 11, 2019, 8:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.