रायगड - जिल्ह्यातील पनवेल भागात आणि किनार पट्टीतील भागात शुक्रवारी सकाळपासुन परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 'महा' चक्रीवादळाचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे पावसाचा कंटाळा आला आहे, असे म्हणूनही पाऊस मात्र राज्याची पाठ सोडणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा... नुकसानीचे पंचनामे करण्यात मराठवाड्यात बीड जिल्हा अव्वल, ८९७ गावांचे पंचनामे पूर्ण
परतीच्या पावसाने नागरिकांची दैना..
मध्य महाराष्ट्रावर घोंगावणारे वादळ किनारपट्टीवर येई पर्यंत शमताना दिसत आहे. मात्र असे असले तरी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईसह पनवेलमध्येही मुसळधार पाऊस सुरू झाला. या परतीच्या पावसामुळे मात्र नागरिकांची दैना उडवली आहे. पाऊस अखेर थांबला आहे, असे गृहीत धरत कामावर आलेल्या पनवेलकरांची अचानक आलेल्या पावसामुळे प्रचंड धावपळ उडाली.
हेही वाचा... 'महा'चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार; मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड, चाकरमान्यांचे हाल