ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग; नद्या तुडूंब - दुपारनंतर

सोमवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. अंबा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने शहरातील बाजारपेठेत पाणी घुसले आहे. तसेच रोहा तालुक्यातील तांबडी येथील रस्त्यावर दरड कोसळल्याने काही काळ रस्ता बंद झाला होता.

नद्या तुडूंब भरुन वाहत आहे
author img

By

Published : Jul 2, 2019, 5:05 PM IST

रायगड - जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पावसाची संततधार सुरूच आहे. सोमवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच नागोठणे पाली मधील अंबा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने शहरातील बाजारपेठेत पाणी घुसले आहे. शिवाय नागोठणे पाली येथील रस्त्यावरही पाणी साचल्याने काही काळ खोपोलिकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

रोहा तालुक्यातील तांबडी येथील रस्त्यावर दरड कोसळल्याने काही काळ रस्ता बंद झाला होता. तसेच अलिबागमधील बिडवागळे येथील पूल तुटल्याने गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे पहिल्याच पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मंगळवारी पावसाने सकाळी थोडी उसंत घेतली असली तरी दुपारनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी आणि उन्नई या नद्या दुथडी भरून वाहत आहे.

शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. घरात घुसलेले पाणी काढण्याचे काम नागरिक करीत आहेत. नागोठणे पाली रस्त्यावरही पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता. पावसाने आता थोडी उसंत घेतल्याने वाहतूक सुरू झाली आहे. रोहा तालुक्यातील तांबडी रस्त्यावर पहाटे दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेली दरड काढल्यानंतर पाच तासानंतर वाहतूक सुरू झाली.

अलिबाग तालुक्यातील बिडवागळे पूल कोसळल्यामुळे शेताकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांना शेतात जाण्यास त्रास सहन करावा लागला. शेतातही पाणी साचले आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पावसाने गेल्या पाच दिवसात जोरदार बॅटिंग केली असल्याने जिल्ह्यात सगळीकडे पाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुपारनंतर पावसाने उसंत घेतली असल्याने काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले आहे.

Intro:
जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, नद्या तुडूंब वाहू लागल्या

दरड, पुल कोसळून वाहतूक ठप्प

दरड काढल्यानंतर पाच तासाने वाहतूक सुरळीत

अंबा नदीची धोक्याची पातळी खाली आली

जनजीवन विस्कळीत, दुपारनंतर पावसाचा जोर झाला कमी

रायगड : जिल्ह्यात पाचव्या दिवशी पावसाची संततधार सुरू असून रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. नागोठणे मधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात बाजारपेठेत पाणी घुसले आहे. नागोठणे पाली रस्त्यावरही पाणी साचल्याने काही काळ खोपोलिकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. रोह्यात तांबडी येथे दरड कोसळून रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला होता. अलिबागमधील बिडवागळे येथील पूल तुटल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे पहिल्या पावसात जिल्ह्यात पुरोरिस्थिती व दरड कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.Body:जिल्ह्यात चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आज पावसाने सकाळी थोडी उसंत घेतली असली तरी दुपारनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. पावसाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, उन्नई धरण या नद्या तुथडी भरून वाहत आहे. तर अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने शहरात पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. पाण्याची पातळी कमी झाली असली तरी नागरिकांच्या घरात घुसलेले पाणी काढण्याचे काम नागरिक करीत आहेत. नागोठणे पाली रस्त्यावरही पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद केला होता. पावसाने आता थोडी उसंत घेतल्याने वाहतूक सुरू झाली आहे.Conclusion:रोहा तालुक्यातील तांबडी रस्त्यावर पहाटे दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेली दरड काढल्यानंतर पाच तासानंतर रस्त्याची वाहतूक सुरू झाली. अलिबाग तालुक्यातील बिडवागळे पूल पडल्यामुळे या गावातील लोकांचा शेताकडे जाण्याचा रस्ता बंद झाला असून शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात पावसाने गेल्या पाच दिवसात जोरदार बॅटिंग केली असल्याने जिल्ह्यात सगळीकडे पाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुपारनंतर पावसाने उसंत घेतली असल्याने काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.