रायगड - पेण येथे आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेनंतर पालकमंत्री आदिती तटकरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पेणच्या संबंधित गावात भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून दोन्ही लोकप्रतिनिधींनी खेद व्यक्त केला. आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा व्हावी, ही जशी पीडित कुटुंबाची, नागरिकांची मागणी आहे, तशीच या जिल्ह्याची नागरिक म्हणून माझी देखील आहे, असे सांगून आरोपीला कडक शासन होण्यासाठी सर्व ती पावले उचलली जातील, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. तर या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायलायत चालवून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
पालकमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पेणला भेट - पेण आदिवासी मुलीवर बलात्कार रायगड
पेणमधील एका गावात तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले.
![पालकमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पेणला भेट रायगड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10061356-672-10061356-1609339599905.jpg?imwidth=3840)