ETV Bharat / state

शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कोळी बांधवाचाही सहभाग होता. देशभर होत असलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला.

author img

By

Published : Jan 8, 2020, 11:47 PM IST

government employees marched to raigad district collector office
विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रायगड - शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज बुधवारी राज्यभर संप पुकारला गेला. रायगड जिल्ह्यातही शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले. शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शासकीय कर्मचारी प्रमाणेच कोळी बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा... राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा 'धुरळा', नागपुरात गडकरींसह फडणवीसांना धक्का

रायगड जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी एलईडी, पर्ससीन नेट अशा आधुनिक मच्छीमारीवर बंदी आणण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामुळे बुधवारचा दिवस हा मोर्चाचा दिवस ठरला. रायगड जिल्ह्यात मोर्चे काढण्याच आले, तरी बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.

हेही वाचा... 'भाजप सरकारकडून गुंडाना खुले संरक्षण'

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या असून, याबाबत एक दिवसाचा संप पुकारला होता. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच अन्य शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले. त्यामुळे गजबजलेल्या शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळाला. बँकेचे कर्मचारीही संपात सहभागी असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा फटका ग्राहकांना बसला. जिल्हा परिषदेचे कर्मचारी या संपात सहभागी झाले नसले, तरी काळ्या फिती लावून संपाला प्रतिसाद दिला.

हेही वाचा... देशव्यापी संपात बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग; बँकेच्या सेवा विस्कळीत

जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठा बंद करण्यात आलेल्या होत्या. मच्छीमार कोळी बांधवांनीही आधुनिक मच्छीमारीवर बंदी करण्यासाठी मोर्चा काढला. त्यामुळे अलिबागमध्ये एकाचवेळी मच्छीमार, शासकीय कर्मचारी यांचे मोर्चे निघाले होते. पोलिसांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आलेले दोन्हीही मोर्चे पोलिसांनी अरुणकुमार वैद्य हायस्कुल जवळ अडवले. त्यानंतर दोन्ही मोर्चेकरांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

Intro:

शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोळी बांधवाचाही मोर्च्यात सहभाग

भारत बंदला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद, व्यवहार सुरळीत

रायगड : शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज राज्यभर संप पुकारला आहे. रायगड जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनीही एलईडी, पर्ससीन नेट अशा आधुनिक मच्छीमारीवर बंदी आणण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामुळे आजचा दिवस हा मोर्चाचा ठरला आहे. आज भारत बंद असला तरी रायगड जिल्ह्यात या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या संपाला जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

.

Body:राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या असून आज याबाबत एक दिवसाचा संप पुकारला आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच अन्य शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे गजबजलेल्या शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळत होता. बँकेचे कर्मचारीही संपात सहभागी असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा फटका हा ग्राहकांना बसला आहे. जिल्हा परिषदेचे कर्मचारी या संपात सहभागी झाले नसले तरी काळ्या फिती लावून संपाला प्रतिसाद दिला आहे.
Conclusion:भारत बंदची हाक दिली असताना जिल्ह्यात मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठा बंद करण्यात आलेल्या होत्या. मात्र जिल्ह्यात इतर ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मच्छीमार कोळी बांधवांनीही आधुनिक मच्छीमारीवर बंदी करण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यामुळे आज अलिबागमध्ये मच्छीमार, शासकीय कर्मचारी यांचे मोर्चे निघाले होते. पोलिसांनीही मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला होता. आलेले दोन्हीही मोर्चे पोलिसांनी अरुणकुमार वैद्य हायस्कुल जवळ अडविण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही मोर्चेकरांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.