ETV Bharat / state

कोरोना, लॉकडाऊनवर मात करुन पेणचे बाप्पा निघाले फॉरेनला . . .

भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाप्पाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट पसरले होते. त्यातच रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना कलाकारांनी पेण शहरातील कला केंद्रामधून 1500 ते 2000 गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया व मॉरिशस येथे पाठवल्या आहेत.

raigad
गणेशमूर्तीला सजवताना कलाकार
author img

By

Published : Jul 4, 2020, 7:20 PM IST

Updated : Jul 4, 2020, 8:25 PM IST

पेण (रायगड) - लॉकडाऊन आणि जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटावर मात करुन पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती फॉरेनला निघाल्या आहेत. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाप्पाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट पसरले होते. त्यातच रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना कलाकारांनी पेण शहरातील कला केंद्रामधून 1500 ते 2000 गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया व मॉरिशस येथे पाठवल्या आहेत. इंडोनेशिया व मॉरिशसला बाप्पाच्या मूर्ती विमानाने गेल्या आहेत. तर दुबई, थायलंडसह इतर देशात मात्र समुद्रमार्गाने मूर्ती पाठवण्यात आल्याची माहिती पेण येथील कला केंद्राच्या मालकांनी दिली आहे.

कोरोना, लॉकडाऊनवर मात करुन पेणचे बाप्पा निघाले फॉरेनला . . .

दरवर्षी पेण तालुक्यातून लंडन, ऑस्ट्रेलिया, थिवी, अमेरिका, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशससह अनेक देशांना बाप्पाची वारी होते. पेण तालुक्यातून दरवर्षी सुमारे 1 लाख गणेश मूर्ती फॉरेनला जातात. लंडन, ऑस्ट्रेलियन, थिवी व अमेरिका येथे बाप्पाच्या मूर्ती कंटेनरमधून समुद्रमार्ग जहाजाने पाठवण्यात येतात. या प्रवासाला 45 ते 50 दिवस लागतात. परंतु यावर्षी लॉकडाउनमुळे या देशांना बाप्पाची वारी होऊ शकली नाही. यावर्षी सुमारे 25 हजार गणेशमूर्तींची वारी फॉरेनला होणार आहे.

प्रत्येक गणेशभक्तांच्या घरात पोहोचणार गणेश मूर्ती

लॉकडाऊन व निसर्ग चक्रीवादळाचा गणेश मूर्तींच्या कामावर जरी परिणाम झाला, तरी लहान आकाराच्या गणेशमूर्ती बनवण्याकडे कारखानदारांचा कल आहे. प्रत्येक भाविकाच्या घरांमध्ये पूजेसाठी मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी गणेशमूर्ती कारखानदारांनी चंग बांधला आहे. 6 इंचापासून 4 फुटापर्यंत पीओपीच्या गणेश मूर्ती बनवण्यात येत आहेत. तसेच 6 इंच ते 2 फुटापर्यंत शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्यात येत आहेत. हिंदू संस्कृती व प्रथा अखंडित राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही पेण तालुक्यातील गणेश मूर्ती कारखानदारांनी दिली.

यावर्षीही 20 लाख गणेशमूर्ती बनवण्याचा निश्चय

पेण तालुक्यात 800 ते 900 गणेशमूर्तींचे कारखाने आहेत. या कारखान्यांमधून सुमारे 1 लाख कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. पेण तालुक्यातून दरवर्षी या कारखान्यांमधून सुमारे 30 लाख गणेशमूर्ती बनविल्या जातात. हमरापूर, जोहे, दादर विभागातून राज्यातील अनेक शहरांमध्ये गणेशमूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही पुरवण्यात येतो. त्यामुळे पेणचे सुबक गणपती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात. परंतु या वर्षी मात्र सुमारे 35 टक्के गणेशमूर्तीचे उत्पादन कमी होणार आहे. ही 35 टक्केची कमतरता भरून काढण्यासाठी कारखानदार जोमाने कामाला लागले आहेत. कोरोनामुळे यावर्षी अंदाजे 20 लाख गणेश मूर्ती बनणार आहेत.

मुंबई-ठाण्यात स्टॉल उपलब्ध होतील ?

मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथे गणेशमूर्ती विक्रीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारून 'श्री'च्या मूर्तीची विक्री केली जाते. परंतु यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शहरांमध्ये सदरचे स्टॉल उभारण्यात येतील की नाही ? याबद्दल मात्र शंका उपस्थित केली जात आहे.

मंडळांच्या बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीवर निर्बंध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मुंबई व परिसरात सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीच्या उंचीवर निर्बंध येणार आहेत. मंडळाच्या बाप्पाची मूर्ती अंदाजे 4 फूटापर्यंत असणार आहे.

Last Updated : Jul 4, 2020, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.