रायगड - प्री-वेडिंग शूटिंग करणाऱ्या जोडप्यांना आता प्रशासनाचे अभय मिळणार आहे. प्री-वेडिंग शूटिंगमधून पर्यटन विकास साधा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. याबाबत पोलीस आणि प्रशासन यांनी नियमावली तयार करावी, असेही अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी, पर्यटन स्थळी प्री-वेडिंग करणाऱ्या जोडप्यांना आणि शुटींग करणाऱ्यांना आता कोणतीही अडचण येणार नाही.
प्री-वेडिंगला आलेले जोडपे हनिमूनलाही रायगडात आले पाहिजे- अजित पवार - raiagad latest news
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीवर्धन येथे नगरपरिषद पाणी पुरवठा योजना आणि समुद्रकिनारा सुशोभीकरण भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रवींद्र राऊत शाळेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात केलेल्या भाषणात अजित पवार यांनी प्री-वेडिंग बाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
अजित पवार