ETV Bharat / state

कर्जाचे अमिष दाखवून फसवणूक; चार वर्षानंतर दिल्लीचे चार भामटे अखेर जेरबंद

या आमिषाला तक्रारदार यांनी कर्ज मिळण्याच्या आशेने बळी पडले. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून प्रोसेसिंग व इतर वेगळी कारणे सांगून ५६ महिन्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये ११ लाख ६० हजार ४८० रुपये रक्कम भरून घेतली.

चार वर्षानंतर दिल्लीचे चार भामटे अखेर जेरबंद
author img

By

Published : Apr 12, 2019, 8:13 AM IST

रायगड - कमी कागदपत्रे देऊन जास्तीत जास्त कर्ज देण्याचे आमिष दाखवून अलिबागमधील एकाला लुटणाऱ्या दिल्लीच्या चार भामट्यांना चार वर्षानंतर अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दिल्लीच्या भामट्यांनी तक्रारदाराला ११ लाख ६० हजार ४८० रुपयाला गंडविले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या भामट्यांकडून ६ लाख ४५ हजार ४८० रुपये हस्तगत केले आहे.

चार वर्षानंतर दिल्लीचे चार भामटे अखेर जेरबंद

या गुन्ह्यातील दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यातील राहुल अशोककुमार वर्मा (वय ३५, रा. जि. लखनौ, उत्तर प्रदेश) सोनू सुरेंद्र (वय ३०, रा. नवीन रजितनगर दिल्ली) राहुल दयानंद चंडालिया (वय ३१, रा. नवीन रजितनगर दिल्ली) राहुल कुमार/अशोक कुमार उर्फ मनोजकुमार श्रीरामतिरथ वर्मा (वय २४, जि. सुलतानपुर, उत्तर प्रदेश) या ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली.

अलिबागमधील तक्रारदारांनी २०१५ मध्ये अज्ञात व्यक्तींनी मोबाईलवरून तसेच ई-मेलद्वारे कोणत्याही कारणासाठी कमीत कमी कागदपत्रे देऊन जास्तीत जास्त कर्ज मिळवुन देतो, असे आमिष दाखवले होते. या आमिषाला तक्रारदार यांनी कर्ज मिळण्याच्या आशेने बळी पडले. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून प्रोसेसिंग व इतर वेगळी कारणे सांगून ५६ महिन्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये ११ लाख ६० हजार ४८० रुपये रक्कम भरून घेतली. मात्र पैसे देऊनही कर्ज काही तक्रारदार याना मिळालेच नाही. त्यामुळे आपण फसलो गेलो, हे लक्षात आल्यावर तक्रारदारांनी १३ जानेवारी २०१६ ला अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतरही आरोपीचा शोध लागला नाही. त्यामुळे हे गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी वर्ग केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. गुन्हाच्या तपासामध्ये गोपनिय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण या सखोल तपास केला. आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ दिवस दिल्ली येथे तळ ठोकला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यातील राहुल अशोककुमार वर्मा, सोनू सुरेंद्र, राहुल दयानंद चंडालिया, राहुल कुमार/अशोक कुमार उर्फ मनोजकुमार श्रीरामतिरथ वर्मा या ४ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून ६ लाख ४५ हजार ४८० रुपये हस्तगत केले. आरोपींना न्यायलायत हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Intro:
कर्जाचे आमिष दाखवून फसविणारे दिल्लीचे चार भामटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

चार वर्षानंतर आरोपीना ठोकल्या बेड्या

रायगड : कमी कागदपत्रे देऊन जास्तीत जास्त कर्ज देण्याचे आमिष दाखवून अलिबागमधील एकाला लुटणाऱ्या दिल्लीच्या चार भामट्यांना चार वर्षानंतर बेड्या घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तक्रारदार याना या दिल्लीच्या भामट्यांनी 11 लाख 60 हजार 480 रुपयांचा चुना लावला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या भामट्यांकडून 6 लाख 45 हजार 480 रुपये हस्तगत केले आहे.

सदर गुन्ह्यातील दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यातील राहुल अशोककुमार वर्मा वय.35 वर्ष, रा. जि. लखनौ, उत्तर प्रदेश, सोनू सुरेंद्र वय.30 वर्ष, रा. नवीन रजितनगर दिल्ली, राहुल दयानंद चंडालिया, वय 31 वर्ष, रा. नवीन रजितनगर दिल्ली, राहुल
कुमार/अशोक कुमार उर्फ मनोजकुमार श्रीरामतिरथ वर्मा, वय 24 वर्ष ,जि. सुलतानपुर, राज्य-उत्तर प्रदेश या 4 आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे.Body:अलिबाग मधील तक्रारदार यांना सन 2015 मध्ये अज्ञात व्यक्तींनी मोबाईलवरून तसेच ई मेलद्वारे कोणत्याही कारणासाठी कमीत कमी कागदपत्रे देऊन जास्तीत जास्त कर्ज मिळवुम देतो असे आमिष दाखवले होते. या आमिषाला भुलून तक्रारदार यांनी कर्ज मिळण्याच्या आशेने फसले गेले. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून प्रोसेसिंग व इतर वेगळी कारणे सांगून 56 महिन्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 11 लाख 60 हजार 480 रुपये रक्कम भरून घेतली. मात्र पैसे देऊनही कर्ज काही तक्रारदार याना मिळालेच नाही. त्यामुळे आपण फसलो गेलो हे लक्षात आल्यावर तक्रारदार यांनी 13 जानेवारी 2016 रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतरही आरोपीचा शोध लागला नाही. त्यामुळे सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी वर्ग केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व पथकाने सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला. गुन्हाच्या तपासामध्ये गोपनिय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण या आधारे अत्यंत परिश्रमपूर्वक व सखोल तपास केला. आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ दिवस दिल्ली येथे तळ ठोकला होता.Conclusion:स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यातील राहुल
अशोककुमार वर्मा, सोनू सुरेंद्र, राहुल दयानंद चंडालिया, राहुल कुमार/अशोक कुमार उर्फ मनोजकुमार श्रीरामतिरथ वर्मा या 4 आरोपीना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपिकडून 6 लाख 45 हजार 480 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायलायत हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचीन गुंजाळ यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार जे.ए.शेख, पोलीस निरीक्षक स्था.गु.अ.शाखा,रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे
पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व पथकाने पार पाडली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.