ETV Bharat / state

माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

author img

By

Published : Sep 15, 2019, 5:27 PM IST

प्रभाकर मोरे हे रायगडच्या महाड विधानसभा मतदार संघातून १९९०, १९९५ आणि १९९९ असे सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. युती सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे ग्रामविकास खाते तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होते.  पक्षांतर्गत वादामुळे काही वर्षांपूर्वी ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते.

माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रायगड - राज्याचे माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे काल मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी १४ सप्टेंबरला उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर रविवारी महाड वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा अमित याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

प्रभाकर मोरे हे रायगडच्या महाड विधानसभा मतदार संघातून १९९०, १९९५ आणि १९९९ असे सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. युती सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे ग्रामविकास खाते तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होते. पक्षांतर्गत वादामुळे काही वर्षांपूर्वी ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यानंतर पुन्हा ते शिवसेनेत आले होते. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तसेच कोथूर्डे धरणाच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता.

हे ही वाचा - अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्राचे ज्ञानच नाही; त्या काय सुधारणा करणार - सुब्रमण्यम स्वामी

दरम्यान, प्रभाकर मोरे यांचे पार्थिव महाडमधील त्यांच्या तपोवन या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक मोठ्या संख्येने अखेरच्या दर्शनासाठी उपस्थित होते. महाडच्या मुख्य बाजारपेठेतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. महाडच्या वैकुंठ भूमीत पोलीस मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे ही वाचा - काश्मिरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी मदत करा; मलालाची संयुक्त राष्ट्राला विनंती

Intro:माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाडच्या वैकुंठ भूमीत झाले अंत्यसंस्कार

रायगड : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे काल मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गेले अनेक दिवस त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. काल 14 सप्टेंबर रोजी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योज मालवली. आज 15 सप्टेंबर रोजी महाड वैकुंठ भूमीत शासकीय इतमामात त्याच्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा अमित याने त्यांना अग्नी दिला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सामील झाले होते.Body:प्रभाकर मोरे हे रायगडच्या महाड विधानसभा मतदारसंघातुन 1990, 1995 व 1999 असे सलग 3 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. युती सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे ग्रामविकास खाते तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सांभाळले होते. काही वर्षांपूर्वी पक्षांतर्गत वादामुळे ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत आले. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तसेच कोथूर्डे धरणाच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. Conclusion:प्रभाकर मोरे याचे पार्थिव महाडमधील तपोवन या निवस्थानी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, त्याचे चहाते, कार्यकर्ते, नातेवाईक मोठ्या संख्येने अखेरच्या दर्शनासाठी उपस्थित होते. महाडच्या मुख्य बाजारपेठेतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. महाडच्या वैकुंठ भूमीत पोलीस मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.