ETV Bharat / state

महाड शहरात पुन्हा पूरस्थिती; एडीआरएफ पथक महाडमध्ये दाखल, मदतकार्य सुरू

मागील दोन दिवस दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा या तालुक्यात कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर महाड शहरात पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील पूरस्थिती
author img

By

Published : Aug 6, 2019, 9:09 PM IST

Updated : Aug 6, 2019, 10:41 PM IST

रायगड - मागील दोन दिवस दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा या तालुक्यात कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सावित्री, काळ, गांधारी या तीनही नद्या दुथडी भरून वाहत असून सावित्री नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वहात आहे. महाड शहरात पाणी घुसले असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

माहिती देताना जिल्हाधिकारी

महाडमधील आकले गाव पाण्यात बुडाले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर तालुक्यात अतिवृष्टीने ३० घरांची पडझड झाली आहे. महाड शहराच्या भोईघाट, बाजारपेठ, काजळपुरा, सुकटगल्ली, दस्तुरी नाका भागात पुराचे पाणी शिरले आहे. चवदार तळ्याचे पाणी तलावातून बाहेर फेकले जात आहे. वरंधा घाट परिसरात कोसळणारे पाणी थेट महाडच्या बिरवाडी परिसरात उतरते आहे. त्यामुळे हा परिसर जलमय झाला आहे.

शिवथरघळ, बारसगाव रस्ता, वाकीजवळ पाण्याखाली गेला आहे. गांधारी पूल पाण्याखाली गेला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून महाड ते भोर रस्ता बिरवाडीजवळ पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मुगवली येथे रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. विद्यापीठाकडे येणाऱ्या मार्गावर वाय पॉईंट येथे ३ ते ४ विद्यार्थी पाण्यात अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पावसाचा जोर वाढल्याने दुपारनंतर ग्रामीण भागातील शाळा सोडून देण्यात आल्या होत्या.

महाडमधील पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने एनडीआरएफ पथक पोहोचले असून मदतकार्य सुरू केले आहे. तर भारतीय सैन्य दलाची तुकडी व कोस्टल गार्ड पथक महाडमध्ये पोहोचत आहे. मिळालेल्या महितीनुसार, रात्री दहा वाजेपर्यंत एनडीआरएफच्या पथकाकडून जवळपास १२५ जणांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात यश आले आहे. लवकरच सैन्य दलाची तुकडी व कोस्ट गार्ड पथक दाखल होणार आहे.

Intro:दक्षिण रायगडात पावसाचे धुमशान सुरूच

महाड शहरात पुन्हा पूरस्थिती

मुंबई गोवा महामार्गावर

एडीआरएफ पथक महाड मध्ये दाखल, मदतकार्य सुरू

सैन्य दलाची व कोस्ट गार्ड पथकही रवाना

रायगड : गेले दोन दिवस दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा या तालुक्यात कोसळत असलेल्या पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. सावित्री, काळ, गांधारी या तीनही नद्या दुथडी भरून वाहत असून सावित्री नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वहात आहे. महाड शहरात पाणी घुसले असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महाडमधील आकले गाव पाण्यात बुडाले असून नागरिकांना सुस्थळी हलविण्यात आले आहे. तर तालुक्यात अतिवृष्टीने 30 घराची पडझड झाली आहे.Body:महाड शहराच्या भोईघाट, बाजारपेठ , काजळपुरा, सुकटगल्ली दस्तुरी नाका भागात पुराचे पाणी शिरले आहे. चवदार तळ्याचे पाणी तलावातून बाहेर फेकले जात आहे. वरंधा घाट परिसरात कोसळणारे पाणी थेट महाडच्या बिरवाडी परिसरात उतरते आहे त्यामुळे हा परिसर जलमय झालाय. शिवथरघळ, बारसगाव रस्ता वाकीजवळ पाण्याखाली गेला आहे. गांधारी पूल पाण्याखाली गेला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून महाड ते भोर रस्ता बिरवाडीजवळ पाण्याखाली जाण्याची शक्यता आहेConclusion:मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मुगवली येथे रस्त्यावर पाणी आल्याने मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. विद्यापीठाकडे येणाऱ्या मार्गावर वाय पॉईंट येथे 3 ते 4 विद्यार्थी पाण्यात अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पावसाचा जोर वाढल्याने दुपारनंतर ग्रामीण भागातील शाळा सोडून देण्यात आल्या होत्या.

महाड मधील पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने एनडीआरएफ पथक पोहचले असुन मदत कार्य सुरू केले आहे. तर भारतीय सैन्य दलाची तुकडी व कोस्टल गार्ड पथक महाडमध्ये पोहचत आहे.
Last Updated : Aug 6, 2019, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.