ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; अनेक ठिकाणी वाहतूक बंद

author img

By

Published : Sep 4, 2019, 11:08 AM IST

Updated : Sep 4, 2019, 11:54 AM IST

जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे, महाड, नागोठणे, रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, रोहा-नागोठणे रस्त्यावर भिसे खिंड आणि ताम्हणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात पूरस्थिती

रायगड - जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे, महाड, नागोठणे, रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, रोहा-नागोठणे रस्त्यावर भिसे खिंड आणि ताम्हणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेत.

रायगड जिल्ह्यात पूरस्थिती

हेही वाचा - पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पुढील 72 तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ऐन गणेशोत्सव काळात पुन्हा जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरड कोसळल्याने माणगाव-पुणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, माणगाव-श्रीवर्धन मार्गावरील मोर्बे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, मुरुड-भालगाव रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. रोहा-नागोठणे रस्त्यावर भिसे खिंड आणि ताम्हणी घाटात दरड कोसळली असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणा ढिगारा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - माळीणची ५ वर्ष : दरड नव्हे...डोंगरच कोसळला अन् होत्याचे नव्हते झाले

महाड शहरातील सुकट गल्ली, दस्तुरी नाका, रायगड रोड, बाजारपेठ या भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. नागोठणेत अंबा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठणे बस स्थानक, बाजरपेठ भागात पाणी साचले आहे. रोह्यात वरसे ग्रामपंचायत हद्दीतही नाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Intro:जिल्ह्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती

सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

रोहा नागोठणे रस्त्यावर व ताम्हणी घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद

गणेशोस्तव काळात वरूणराजाचे विघ्न

रायगड : जिल्ह्यात गणेशशोत्सवची धूम सुरू असताना वरूणराजाचे विघ्न गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण घालण्यास बरसत आहे. जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने महाड, नागोठणे, रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर रोहा नागोठणे रस्त्यावर भिसेखिंडीत व ताम्हणी घाटात दरड कोसळली असल्याने वाहतूक बंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.Body:
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पुढील 72 तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, अंबा नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहरातील सुकट गल्ली, दस्तुरी नाका, रायगड रोड, बाजारपेठ मध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे.

नागोठणे अंबा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागोठणे एसटी स्टँड, बाजरपेठ मध्ये पाणी घुसले आहे. रोह्यात वरसे ग्रामपंचायत हद्दीतही नाले तुडूंब भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. Conclusion:रोहा नागोठणे रस्त्यावर भिसे खिंडीत व ताम्हणी घाट याठिकाणी दरड कोसळली असल्याने दोन्ही कडची वाहतूक बंद झाली आहे. तर संबंधित यंत्रणा दरड काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास ऐन गणेशोस्तव काळात पुन्हा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Last Updated : Sep 4, 2019, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.