रायगड - जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळं जिल्ह्यातील नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामूळे मुख्य रस्ते, बाजारपेठ, नदी किनारी वसलेल्या गावात पाणी घुसले आहे. महाड शहरात सुकट वल्ली, गांधारी नाका आदी भागात पाणी शिरले असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात पावसाने काही दिवास दडी मारली असताना दोन दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. हवामान विभागानेही कोकणात 1 ऑगस्ततनंतर जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज दिला होता. रात्रभर पडत असलेल्या पावसाने महाड येथील सावित्री नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहरातील मुख्य बाजारपेठ, रस्ते या भागात पाणी शिरले आहे. महाड रायगड रस्त्यावरही पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. महाड तालुक्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. गांधारी नदीवरील पुलही पाण्याखाली गेला आहे.
जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर हा अलिबाग मुरुड, पेण, महाड, रोहा, सुधागड, खालापूर तालुक्यात अधिक आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने नदीकिनारी गावातील नारीकना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर यंत्रणेनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.