रायगड- चंद्रावर सर्व सामान्य माणसाला जाणे हे आवाक्याच्या बाहेरचे आहे. मात्र, एक व्यक्ती चक्क चंद्रावर आपले पहिले पाऊल टाकत असून खड्डेमय चंद्रावर चालत असल्याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, यात दिसणारे खड्डे सगळ्याच रस्त्यावर दिसतात त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याच परिसरातील असल्याचे सर्वांना भासत आहेत. त्यामुळे सर्वाना हा व्हीडिओ आवडला आहे.
यातील व्यक्ती चंद्रावर नाही तर चक्क रस्त्यावर पडलेल्या खड्डयांतून चंद्रावर चालावे लागते त्यापद्धतीने चालत आहे. त्यामुळे चंद्रावर असलेली परिस्थिती पृथ्वीवरच शासनानाच्या बेदखल कारभारामुळे तयार झाली आहे. त्यामुळे चंद्रावर जाण्याची गरजच नाही, असे या व्हिडिओद्वारे दिसत आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाची अवस्थाही अशीच झाली असल्याने चंद्रावर जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात ठेकेदार व नॅशनल हायवे अधिकाऱ्यांनी उतरवले आहे. हे मात्र नक्की.
हेही वाचा-खड्डेमय रस्ते, अपघातामुळे चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी करणाचे काम 2011 रोजी सुरू झाले. पळस्पे-इंदापूर हा पहिला टप्पाच नऊ वर्ष झाले तरी अपूर्णच आहे. महामार्ग चौपदरीकरणचा पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण होणार, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र, 2019 अर्धा संपला तरी रस्ता जैसे थे असेच आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे गणेशभक्तांना यावर्षी सुद्धा खड्डेमय रस्त्याचा आनंद घेतच प्रवास करावा लागला आहे.
सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओत सध्या एक व्यक्ती चंद्रावर पडलेल्या खड्डयात अंतरिक्षामध्ये जसे कपडे परिधान करुन चालावे लागतात तसे चालत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की चंद्रावरचा आहे असे भासत आहे. मात्र, ह्या व्हिडीओतील व्यक्ती चंद्रावर नाही तर पृथ्वीवरील रस्त्यावर पडलेल्या खड्यातून चालत आहे. त्याची ही कल्पकता या व्हिडिओमधून सर्व सांगून जात असून एका प्रकारे रस्त्यावर, महामार्गावर पडलेल्या खड्डयांचा तो शांततापूर्ण व विचारक पद्धतीने निषेध व्यक्त करीत आहे. हे या व्हिडिओतून दिसत आहे. मात्र, मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा चंद्रावर आल्याचाच प्रत्यय प्रवाशांना येत आहे हे नक्की.
व्हायरल व्हिडिओतील तरुणाचा सत्कार-
व्हायरल व्हिडिओतील युवक हा बेंगळूरु येथील तुंगानगर परिसरातील असल्याचे समजते. या युवकाचे नाव बादल नंजुडास्वामी असे आहे. त्याने त्याच्या परिसरातील खड्डयांचा निषेध चचंद्रावर असल्यासारखे भासवत केला आहे. याचा हा व्हिडिओ तेथील स्थानिक प्रशासनाने पाहताच याची दखल घेत खड्डयांची दुरुस्ती करुन या तरुणाचा सत्कार आला आहे.