ETV Bharat / state

ONGC Project Fire : रायगड जिल्ह्यातील ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग; दोन कर्मचारी दुखापग्रस्त - उरण रायगड नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला आग

उरण तालुक्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. शिवाय अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत दोन कर्मचारी दुखापग्रस्त झाल्याची माहिती आहे.

प्रकल्पाला लागलेली आग
प्रकल्पाला लागलेली आग
author img

By

Published : Mar 31, 2022, 6:39 PM IST

Updated : Mar 31, 2022, 9:47 PM IST

रायगड - जिल्ह्यातील ओएनजीसी प्रकल्पाला मोठी आग लागली आहे. उरण तालुक्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. शिवाय अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत दोन कर्मचारी दुखापग्रस्त झाल्याची माहिती आहे. नव्या प्रकल्पाचे काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी पडून आग लागली असल्याची माहिती आहे.

ओएनजीसी प्रकल्पाला लागलेली आग

गुरुवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पामध्ये आग लागल्याची घटना घडली. ओएनजीसी प्रकल्पामध्ये नव्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पामधील नाल्यांमधून बाहेर जाणारे तेल एका पाण्याच्या तलावामध्ये साठविण्यात येते. या तेलावर प्रक्रिया करून, तेल वेगळे करण्यात येते. या साठवण तलावाला अचानक आग लागल्याने मोठा भडका उडाला होता. यावेळी सुरू असलेल्या कामातील मजुरांमध्ये गोंधळ उडाला. तर बनारसी भुईया २८, बबनु सूरज भूईया ४० हे दोन मजूर कामगार सुमारे 20 टक्के भाजले आहेत. या मजुरांवर उरणच्या पालवी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या आधी लागलेल्या आगीनमध्ये 5 जणांचा मृत्यू : अरबी समुद्राच्या मध्यभागी असणाऱ्या बॉम्बे हाय या नैसर्गिक तेल आणि गॅस विहिरींमधून कच्चे तेल आणि गॅस उरण स्थित ओएनजीसी प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. यातून तेल आणि गॅस शुद्धीकरण करून, देशभरात वितरित केले जाते. संवेदनशील असणाऱ्या या प्रकल्पाबाबत येथील रहिवाशांमध्ये भीती असून, गुरुवारी लागलेल्या आगीमुळे येथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तर 1 सप्टेंबर 2020 ला लागलेल्या भयानक आगीमध्ये अग्निशमन दलाचे 4 जवान मयत झाले होते. तर एक वरिष्ठ अधिकार्याचाही मृत्यू झाला होता. अशाच प्रकारे 2007 मध्ये लागलेल्या आगीमध्ये एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता. सातत्याने आग लागून, मनुष्यहानी होत असल्याने, तालुक्यामध्ये या प्रकल्पाबाबत भीती आहे.

हेही वाचा - Running Bus Fire : नागपुरातील मेडिकल चौकात धावत्या बसला आग; प्रवासी सुखरुप

Last Updated : Mar 31, 2022, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.