ETV Bharat / state

तळोजा एमआयडीसीत बेकायदेशीरपणे ठेवलेल्या केमिकल कचऱ्याला आग; जीवितहानी नाही - तळोजा एमआयडीसीत आग

तळोजा एमआयडीसीत इंजिनीअरिंग, मत्स्य प्रक्रिया, खाद्य, केमिकल आदी वेगवेगळे कारखाने आहेत. या कारखान्यांमधील कचरा बेकायदेशिररित्या कासाडी नदी शेजारी टकण्यात येतो. या कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही महिन्यांपूर्वीच पडघे येथील स्थानिक रहिवाशांनी केली होती. पनवेल पालिकेने वेळीच लक्ष घातले असते तर आजची दुर्घटना टळली असती, अशी तक्रार नागरिक करत आहेत.

aag
तळोजा एमआयडीसीत बेकायदेशीर केमिकल साठ्याला आग
author img

By

Published : Dec 14, 2019, 6:12 PM IST

ठाणे - तळोजा एमआयडीसीत बेकायदेशीरपणे ठेवलेल्या रसायनिक कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. पडघे गावाशेजारी असणाऱ्या कासाडी नदीजवळ मोकळ्या जागेचे हा कचरा टाकण्यात आला आहे. कचऱ्यातील रसायनांमुळेच ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग पसरण्याआधीच विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा - कासाडी नदीचे रुप बदलणार; दंडाच्या रकमेतून केला जाणार 13 कोटींचा खर्च

तळोजा एमआयडीसीत इंजिनीअरिंग, मत्स्य प्रक्रिया, खाद्य, केमिकल आदी वेगवेगळे कारखाने आहेत. या कारखान्यांमधील कचरा बेकायदेशिररित्या कासाडी नदी शेजारी टकण्यात येतो. या कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही महिन्यांपूर्वीच पडघे येथील स्थानिक रहिवाशांनी केली होती. मात्र, या भंगार अड्ड्यांवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पनवेल पालिकेने वेळीच लक्ष घातले असते तर आजची दुर्घटना टळली असती, अशी तक्रार नागरिक करत आहेत.

Intro:आधी फोटोज पाठवले आहेत

पनवेल

पनवेलमधल्या तळोजा एमआयडीसीत बेकायदेशीर केमिकल साठ्याला आग लागल्याची घटना घडली आहे. तळोजा एमआयडीसीत पडघे गावाशेजारी असणाऱ्या कासाडी नदीजवळच मोकळ्या जागेवर हा बेकायदेशीर केमिकल वेस्टचा साठा ठेवण्यात आला होता. याच साठ्यातील रसायनांमुळे ही आग लागली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही आग पसरण्याआधीच विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. Body:तळोजा एमआयडीसीत इंजिनीअरिंग, मत्स्य प्रक्रिया, फूड, केमिकल्स आदी वेगवेगळी कारखाने सुरू असतात. या कारखान्यातुन निघणार केमिकलचा साठा हा बेकायदेशीररित्या जवळच्याच कासाडी नदी शेजारी ठेवण्यात येत होता. हे भंगार अड्डे फक्त कारखानदारांच्या भंगारसाठीच वसलेले आहेत. बहुतेक अड्ड्यांवर कारखान्यांचे केमिकल देखील हाताळण्यात येते. या बेकायदेशीर केमिकल साठ्यामुळे आगीच्या घटना घडण्याची भीती असून त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार काही महिन्यांपूर्वीच पडघे येथील स्थानिक रहिवाशांनी दिली होती.

मात्र, या भंगार अड्ड्यांवर कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही. कारवाईची वेळ आल्यानंतर पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ कारवाईसाठी एकमेकांकडे बोट दाखवतात. जर पनवेल पालिकेने वेळीच लक्ष घातलं असतं तर आजची दुर्घटना टळली असती, असं नागतिकांच म्हणणं आहे.
Conclusion:आज याच बेकायदेशीर केमिकल साठ्यातील रसायनांनी पेट घेतल्यानं ही आग लागली. यातीलरसायनांचा साठा, फायबर आणि प्लास्टिकचे भंगार जळून खाक झाले. त्यांनतर याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन आग वेळीच आटोक्यात आणली. वेळीच अग्निशमन विभागाचे जवान पोहोचल्याने संभाव्य दुर्घटना टळली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.