ETV Bharat / state

मुरूड फार्म पार्क प्रकल्पाला शेतकरी, मच्छीमारांचा विरोध - raigad fishermen news

सरकाने भूसंपादन मागे घ्यावे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‌ॅ.ड महेश मोहिते यांनी अलिबाग तुषार विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

raigad
raigad
author img

By

Published : Jan 12, 2021, 6:00 PM IST

रायगड - रायगड जिल्ह्यात फार्मपार्क प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी मुरुड व रोहा तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. असे असूनही प्रशासनाचे अधिकारी शासनाची दिशाभूल करीत आहेत. भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध असल्यमुळे भारतीय जनता पक्षाचा (भाजपा) त्यास विरोध आहे. त्यामुळे सरकाने भूसंपादन मागे घ्यावे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‌ॅड. महेश मोहिते यांनी अलिबाग तुषार विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

'अधिकारी शासनाकडे चुकीचा अहवाल देत आहेत'

प्रस्तावित फार्मपार्क प्रकल्पाकरीता भूसंपादन करण्यासाठी मुरुड, रोहा, अलिबाग तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यासाठी 32/2च्या नोटीस बजावण्यात आल्या. त्यास 50 टक्क्यांपेक्ष्या जास्त खातेदारांनी हरकती नोंदवून जमिनी देण्यास विरोध दर्शवला आहे. असे असूनही शेतकऱ्यांच्या हरकती लपविल्या जात आहेत. प्रांताधिकारी शासनाकडे चुकीचा अहवाल पाठवत आहेत. शेतकऱ्यांचा विरोध असूनही भूसंपादन लादले जात आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा कट आहे, असा आरोप मोहिते यांनी केला.

शेतकरी, मच्छीमारांचा आहे विरोध

काही लोकांनी मुरुड व रोहा तालुक्यात यापूर्वी जमिनी विकत घेऊन ठेवल्या आहेत. त्या जमिनी विकल्या जाव्यात आपल्याला आपले पैसे परत मिळावेत, यासाठी त्यांचा प्रयत्न आहेत. या लोकांचा प्रस्तावित फार्मपार्क प्रकल्पाला विरोध नाही. परंतु शेतात राबून शेती करतोय त्या शेतकऱ्यांचा, येथील कोळी बांधवांचा या प्रकल्पाला विरोध आहे. जमिनी गेल्या तर शेतकरी व कोळी उद्ध्वस्त होईल, असे त्यांनी सांगितले.

भाजपाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांचा विरोध असतानादेखील शासनाला चुकीची माहिती देऊन हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न आहे. शासनाला चुकीचा अहवाल पाठवून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांचा विरोध डावलून हा प्रकल्प आणला जात असेल तर त्याला आमचा विरोध आहे. शासनाने हे भूसंपादन मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. ती मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

'संपादित जागेवर प्रकल्प करा'

शासनाने एमआयडीसीच्या माध्यमातून आलिबाग तालुक्यात यापूर्वी अनेक जमिनी संपादित केल्या आहेत. त्या जमिनी या फार्मपार्क प्रकल्पासाठी द्याव्यात. शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी घेऊन त्यांना भूमिहीन करू नये, असे मोहिते यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.