ETV Bharat / state

जिल्ह्यातील आल्याच्या शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी - आले शेती प्रयोग

म्हसळा तालुक्यातील वरवठणे (मुजफ्फर नगर) येथील शेतकरी हिफझुर फकीह यांना त्यांच्या वडिलांकडून शेतीचा वारसा मिळाला आहे. त्यांनी इस्त्राईल पद्धतीचा वापर करून शेती केली आहे. फकीह यांनी बारा गुंठ्यात बेड आणि ठिबक सिंचनाचा वापर करून आल्याची शेती केली. फकीह यांनी केलेला आल्याच्या शेतीचा प्रयोग हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.

आल्याची शेती
आल्याची शेती
author img

By

Published : Feb 2, 2020, 10:46 AM IST

रायगड - परंपरागत शेतीला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेतीतही उत्पन्न मिळत असल्याचे रायगड जिल्ह्यातील एका 56 वर्षाच्या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. हिफझुर फकीह असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

आल्याच्या शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

म्हसळा तालुक्यातील वरवठणे (मुजफ्फर नगर) येथील शेतकरी हिफझुर फकीह यांना त्यांच्या वडिलांकडून शेतीचा वारसा मिळाला आहे. त्यांनी इस्त्राईल पद्धतीचा वापर करून शेती केली आहे. फकीह यांनी पहिल्या बारा गुंठ्यात बेड आणि ठिबक सिंचनाचा वापर करून आल्याची शेती केली. फकीह यांनी केलेला आल्याच्या शेतीचा प्रयोग हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. याच पद्धतीने आणखी बारा गुंठ्यात कलिंगडाची लागवड केली. फकीह यांना एकूण चोवीस गुंठ्यातील आले आणि कलिंगडच्या शेतीसाठी अडीच लाख रूपये खर्च आला. शेतीतून आठ टन आले आणि पाच टन कलिंगडाचे उत्पादन मिळण्याची फकीह यांना खात्री आहे.बाजार भावानुसार या उत्पादनाची मिळकत दहा लाख रुपये होईल, असे फकीह यांनी संगितले.

हेही वाचा - प्रतिबंध समितीच्या सतर्कतेमुळे नियोजीत बालविवाह रोखण्यात यश

रायगड जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, म्हसळा पंचायत समितीच्या सभापती उज्वला सावंत, माजी सभापती छाया म्हात्रे, उपसभापती मधु गायकर, सदस्य संदीप चाचले, उपनगराध्यक्ष शोएब हळदे, गटविकास अधिकारी वाय.एस.प्रभे, कृषी अधिकारी मंगेश साळी, विस्तार अधिकारी अशोक बाक्कर, प्रदीप डोलारे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर, अनिस हवालदार, फरूक पेनकर, नईम दळवी यांनी यांनी फकीह यांच्या शेतात जाऊन शेतीची पाहणी केली.

फकीह यांच्या सारखी शेती व्यवसायामध्ये आधुनिकता आणणार्‍या आणि प्रयोगशील शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कायम तत्पर असेल असे, आश्वासन जिल्हा परिषदेचे कृषी पशु संवर्धन सभापती बबन मनवे यांनी दिले.

Intro:परंपरागत पद्धतीला नावीन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देत असल्याचे रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील हिफझुर फकीह या 56 वर्षाच्या शेतकर्‍यांनी दाखवून दिले आहे.
Body:आपला देश हा कृषी प्रधान आहे व तो राहावा हाच शेतकर्‍याचा ध्यास असतो.केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वता मेहनत घेऊन म्हसळा तालुक्यातील वरवठणे(मुजफ्फर नगर) येथील प्रयोगशील हिफझुर या शेतकर्‍यांनी बारा गुंठ्यात इजराईल पद्धतीने शक्यतो जिल्ह्यातील पहिली आल्याची(जिंजर) शेती तर उर्वरित बारा गुंठ्यात ब्रांडेड कलिंगडची शेती केली आहे.शेतकर्‍याने केलेल्या आधुनिक शेतीसाठी रायगड जिल्हा परिषदेचे कृषी पशु सवर्धन सभापती बबन मनवे यांनी शेतकऱ्यांचा शेतात जाऊन कौतूक केले. यावेळी त्यांच्या सोबत म्हसळा पंचायत समिती सभापती उज्वला सावंत,माजी सभापती छाया म्हात्रे,उप सभापती मधु गायकर,सदस्य संदीप चाचले,उप नगराध्यक्ष शोएब हळदे,गटविकास अधिकारी वाय.एस.प्रभे,कृषी अधिकारी(प.स) मंगेश साळी,विस्तार अधिकारी अशोक बाक्कर,सहायक वि.अ.प्रदीप डोलारे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर,अनिस हवालदार,फरूक पेनकर,नईम दळवी,यांनी स्वता शेतात जाऊन शेतकर्‍याचे कौतुक केले.
Conclusion:शेतकरी हिफझुर फकीह यांना त्यांच्या वडिलांकडून शेतीचा वारसा मिळाला असून,त्यांनी इजराईल पद्धतीच्या युक्तीचा वापर करून शेती केली.फकीह यांनी पहिल्या बारा गुंठ्यात बेड व ठिबक पद्धतीने आल्याची शेती केली असून त्यांनी शेतीसाठी जी पद्धत वापरली आहे त्या पद्धतीमुळे त्यांना इतर शेती पद्धती पेक्षा तीन पट जास्त उत्पादन मिळणार असल्याचे त्यांनी संगितले.याच पद्धतीने बारा गुंठ्यात ब्रांडेड कलिंगडची शेती केली आहे.फकीह यांना एकूण चोवीस गुंठातील आला व कलिंगडच्या शेतीसाठी अडीच लाख रूपयांच्या खर्चातून आठ टन आला तर कालिंगडचे 5 टन उत्पादन मिळणार असल्याची खात्री आहे.बाजार भावानुसार या उत्पादनाची मिळकत दहा लाख रुपये होईल असे फकीह यांनी संगितले.एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी शेती मध्ये काही नाही म्हणत आपला पारंपरिक शेती व्यवसाय सोडून मुंबई व पुणे येथे नोकरीसाठी जात असतानाच,56 वर्षीय शेतकरी फकीह यांनी जिल्ह्यातील पहिली यशस्वी आल्याची(जिंजर) शेती प्रयोग केल्याचे कळताच संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चौकट- म्हसळा येथील हिफझुर फकीह या शेतकर्‍यांनी जिल्ह्यात नवीन प्रयोग करीत आल्याची शेती केली आहे.फकीह यांचा आदर्श घेत,शेती या व्यवसायामध्ये आधुनिकता आनणार्‍या व प्रयोगशील शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कायम तत्पर असेल- बबन मनवे, कृषी पशु सवर्धन सभापती,जी.प.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.