ETV Bharat / state

निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही अनंत गीतेंवर कारवाई नाही, राष्ट्रवादी उचलणार 'हे' पाऊल

अनंत गीते यांच्‍या प्रचारसभांमधून सिंहावलोकन नावाची पुस्तिका वाटप करण्यात येत आहे. पण या पुस्तिकेवर प्रकाशकाचे नाव नाही. कुठे छापण्यात आली याचा उल्लेख नाही. किती प्रती छापल्या याचा आकडा नाही.

सुनिल तटकरे
author img

By

Published : Apr 22, 2019, 9:05 AM IST

रायगड - शिवसेना उमेदवार अनंत गीते यांच्‍या विरोधात राष्‍ट्रवादी काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. तरीदेखील त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अनंत गीते यांच्‍या प्रचारसभांमधून सिंहावलोकन नावाची पुस्तिका वाटप करण्यात येत आहे. पण या पुस्तिकेवर प्रकाशकाचे नाव नाही. कुठे छापण्यात आली याचा उल्लेख नाही. किती प्रती छापल्या याचा आकडा नाही. हा आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी आपल्या वकिलामार्फत केली होती.

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अलिबाग यांना तक्रारीबाबत कार्यवाही करून कार्य अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पण, अद्याप यावर कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आता ही तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्याचे राष्ट्रवादीने ठरवले आहे.

Intro:रायगडमधील शिवसेना उमेदवार अनंत गीते यांच्‍याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार होऊनही कारवाई नाही

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार - नवाब मलिक

रायगड : रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवार अनंत गीते यांच्‍या विरोधात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. अनंत गीते यांच्‍या प्रचारसभांमधून सिंहावलोकन नावाची जी पुस्तिका वाटण्‍यात येत आहे त्‍या पुस्तिकेवर प्रकाशकाचे नाव नाही, कुठे छापण्‍यात आली त्‍याचा उल्‍लेख नाही तसेच किती प्रति छापण्‍यात आल्‍या आहेत याचीही माहिती देण्‍यात आलेली नाही. हा आचारसंहितेचा भंग असून याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई झाली नाही पुस्तिकेचे वितरण अजून थांबलेलं नाही. तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करण्‍यात येईल , अशी माहिती राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिली.Body:शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी आचारसंहिता भंग केल्याबाबतची तक्रार आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे वकील अड. सचिन जोशी यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अलिबाग यांना अड सचिन जोशी यांनी दिलेल्या तक्रारीबाबत कार्यवाही करून कार्य अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
Conclusion:जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अलिबाग यांना करावी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊनही यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.