ETV Bharat / state

रायगडच्या समुद्रकिनारी सापडले आठ मृतदेह; पी 305 बार्जमधील कर्मचाऱ्यांचे मृतदेह असल्याची शक्यता - tauktae-cyclone latest news

मृतदेह
bodies
author img

By

Published : May 23, 2021, 8:29 AM IST

Updated : May 23, 2021, 10:44 AM IST

10:43 May 23

रायगड - रायगड समुद्र किनाऱ्यावर तीन दिवसांत आठ मृतदेह सापडले आहेत. अलिबाग तालुक्यात शनिवारी सात, मुरूड येथे शुक्रवारी रात्री एक असे पुरुष जातीचे आठ मृतदेह सापडले आहेत. तौक्ते चक्रीवादळा दरम्यान खोल समुद्रात बुडालेल्या पी 305 बार्जवरील मृतदेह असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाने ओएनजीसी आणि मुंबई पोलिसांनी माहिती कळवली आहे. सध्या हे आठही मृतदेह अलिबाग जिल्हा सामान्य रुगणलायत ठेवण्यात आले आहेत. ओएनजीसी पथक नातेवाईकांना घेऊन रायगडात येणार असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.

08:05 May 23

मृतांची ओळख पटवण्यासाठी ओएनजीसी पथक नातेवाईकांना घेऊन रायगडात येणार

रायगडच्या समुद्रकिनारी सापडले आठ मृतदेह

आठ मृतदेह रायगडच्या समुद्रकिनारी
रायगडच्या अलिबाग आणि मुरुड समुद्रकिनारी मृतदेह लागले आहेत. अलिबाग तालुक्यातील नवगाव दोन, सासावणे दिघोडी एक, आवास एक तर किहीम समुद्रकिनारी तीन तर मुरुड समुद्रकिनारी एक असे आठ मृतदेह वाहून समुद्र किनारी आले आहेत. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पोलीस याबाबत तपास करीत आहेत. ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करून डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. तसेच ओएनजीसी अधिकाऱ्यांना ओळख पटविण्यासाठी येण्यास कळविले आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.

मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू
तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून अजूनही सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. तर 66 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मिळालेल्या मृतदेहांपैकी 30 जणांची ओळख पटली आहे.  तर 16 मृतदेह अद्यापही मिळालेले नाहीत. 16 पैकी 3 मृतदेह मुंबईत सापडले आहेत. अलिबाग मुरुड येथे तीन दिवसात आठ मृतदेह सापडले असून हे पी 305 बार्जमधील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बार्जवरील खलाशाच्या वर्णन रायगडच्या समुद्रकिनारी मिळालेल्या मृतदेहाशी मिळते जुळते आहे. मृतदेहाचे डीएनए सॅम्पल काढण्यात आले आहेत. यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. ओएनजीसी अधिकारी आल्यानंतर हे मृतदेह त्या बोटीतील आहेत का हे निष्पन्न होईल.

Last Updated : May 23, 2021, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.