ETV Bharat / state

पनवेल हायवेवर विचित्र अपघात; दिशादर्शक फलकाला अडकल्याने चक्क डंपर झाला पूर्ण उलटा - क्रेन

पनवेल हायवेवर कळंबोलीहून रेती खाली करून आलेला डंपर खांदा कॉलनीजवळ असलेल्या दिशादर्शक फलकला धडकला. यात हा डंपर पूर्ण उलटा होऊन अगदी रॉकेटसारखा उभा झाला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अपघात ज्या विचित्र पद्धतीने घडला त्याला पाहून मनात धडकी मात्र भरते.

पनवेल हायवेवर विचित्र अपघात
author img

By

Published : Jun 15, 2019, 10:36 AM IST

रायगड - पनवेल हायवेवर एक विचित्र अपघात झाला. कळंबोलीहून रेती खाली करून आलेला डंपर खांदा कॉलनीजवळ असलेल्या दिशादर्शक फलकला धडकला. यात हा डंपर पूर्ण उलटा होऊन अगदी रॉकेटसारखा उभा झाला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अपघात ज्या विचित्र पद्धतीने घडला त्याला पाहून मनात धडकी मात्र भरते.

Panvel
पनवेल हायवेवर विचित्र अपघात

कळंबोलीमध्ये रेती खाली करण्यासाठी हा डंपर रेती भरून आणला होता. रेती रिकामी करून हा डंपर पनवेलच्या दिशेने जात होता. यावेळी डंपरची मागची बाजू खाली करायला कदाचित चालक विसरला होता. दरम्यान, खांदा कॉलनीत उड्डाणपूलावरून खाली येत असताना डंपरची मागची बाजू उंच असल्याने ती दिशादर्शक फलकाला अडकली. डंपर वेगात असल्यामुळे संपुर्ण दिशादर्शक फलक वाकला आणि रस्त्यावर आडवा असलेला डंपर या तितक्याच वेगात उभा उलटा झाला.

या विचित्र अपघाताचा थरार पाहून मागील वाहन चालकांनी देखील आपल्या गाड्यांना वेळीच ब्रेक लावल्याने यातील जीवितहानी टाळली. यात डंपरचालकही वरच्या बाजूने गेलेल्या केबिनमध्ये अडकला होता. त्यानंतर वाहतूक पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन डंपर चालकाला काढण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांना पाचारण केले. एवढया भयंकर अपघातातून डंपर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. दिशादर्शक फलकाला अडकलेला डंपर काढण्यासाठी क्रेनदेखील मागवण्यात अली होती. दरम्यान, या अपघातामुळे पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती.

Intro:पनवेल

बातमीला फोटो पाठवत आहे.

पनवेल हायवेवर एक विचित्र अपघात झालाय. कळंबोली हुन रेती खाली करून आलेला डंपर खांदा कॉलनी जवळ असलेल्या दिशादर्शक फलकला धाडला आणि यात हा डंपर पूर्ण उलटा होऊन अगदी रॉकेटसारखा उभा झाला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अपघात ज्या विचित्र पद्धतीने घडला त्याला पाहून मनात धडकी मात्र भरते.
Body:कळंबोलीमध्ये रेती खाली करण्यासाठी हा डंपर रेती भरून आणला होता. रेती रिकामी करून हा डंपर पनवेलच्या दिशेने जात होता. यावेळी रेती खाली करून झाल्यानंतर डंपरची मागची बाजू खाली करायला कदाचित चालक विसरला होता. खांदा कॉलनीत उड्डाणपूलावरून खाली येत असताना डंपरची मागची बाजू उंच असल्याने ती दिशादर्शक फलकाला अडकली. डंपर वेगात असल्यामुळे संपुर्ण दिशादर्शक फलक वाकला आणि रस्त्यावर आडवा असलेला डंपर या तितक्याच वेगात उभा उलटा झाला.
Conclusion:
या विचित्र अपघाताचा थरार पाहून मागील वाहन चालकांनी देखील आपल्या गाड्याना वेळीच ब्रेक लावल्याने यातील जीवितहानी टाळली. यात डंपरचालक ही वरच्या बाजूने गेलेल्या केबिनमध्ये अडकला होता. वाहतूक पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन डंपर चालकाला काढण्यासाठी अग्निशमन अधिकार्यांना पाचारण केलं आणि एवढया भयंकर अपघातातून डंपर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. दिशादर्शक फलकाला अडकलेल्या डंपर काढण्यासाठी क्रेन देखील मागवण्यात अली होती. या विचित्र अपघातामुळे पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.