ETV Bharat / state

जेएनपीटी बंदरातून आलेल्या कंटेनरवर DRI चा छापा; 125 कोटींचे हेरॉईन जप्त - DRI seizes heroin JNPT port

उरणच्या जेएनपीटी बंदरामधून आयात करण्यात आलेल्या कंटेनरवर DRI ने छापा टाकला. यात 125 कोटींचे तस्करी केलेले हेरॉईन जप्त केले आहे.

seizes heroin
जप्त केलेले हेरॉईन
author img

By

Published : Oct 8, 2021, 2:28 PM IST

रायगड - उरणच्या जेएनपीटी बंदरामधून आयात करण्यात आलेल्या कंटेनरवर DRI ने छापा टाकला. यात 125 कोटींचे तस्करी केलेले हेरॉईन जप्त केले आहे. NCB ने केलेल्या कारवाईनंतर आर्यन खान ड्रग प्रकरण गाजत आहे. अशातच तस्करीच्या माध्यमातून जेएनपीटी बंदरात मोठा साठा हाती लागणं ही मोठी उपलबद्धी असल्याचे सांगितले जाते. मात्र, यामुळे आयात निर्यातीमधून तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

seizes heroin
जप्त केलेले हेरॉईन
  • शेंगदाणा तेलाच्या कंटेनरमधून झाली होती तस्करी -

जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून देशात मोठा बदल होत आहे. आयात-निर्यातीच्या व्यवसायाला या बंदराच्या माध्यमातून वेग आला आहे. यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने हे बंदर महत्वाचे ठरले आहे. मात्र, या बंदरातून होणाऱ्या आयात-निर्यातीच्या माध्यमातून तस्करी देखील होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गुरुवारी महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ने मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून कारवाई केली आहे. यामध्ये जेएनपीटी बंदरातून आलेल्या 25 किलो हेरॉईन ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - 'अपना टाईम भी आयेगा..' आयकर विभागाच्या छापा सत्रावरुन संजय राऊतांचा भाजपला सुचक इशारा

इराण येथून मागवण्यात आलेल्या शेंगदाणा तेलाच्या कंटेनरमधून ही तस्करी करण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 125 कोटी किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी संघवी नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सबस्टन्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या आरोपीला 11 ऑक्टोबरपर्यंत डीआरआय कोठडी दिली आहे.

  • बंदरात तस्कर टोळ्या सक्रिय असल्याचे स्पष्ट -

DRI च्या छाप्यानंतर 125 कोटींचे हेरॉईन ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून तस्करी करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बंदरातील सुरक्षा यंत्रणा देखील सक्रिय झाल्या असून, आयात निर्यातीवर चोख पाळत ठेवण्यात येत आहे. मुंबई क्रुझ पार्टीमध्ये अवैद्यरित्या ड्रग्जचा वापर केल्याने आर्यन खान प्रकरण गाजत असताना, आयातीच्या माध्यमातून अमली पदार्थाचा मोठा साठा मिळणे ही एक महत्वाची कारवाई ठरणार आहे.

हेही वाचा - Cruise Drug Case : आर्यन खान आर्थर रोड कारागृहात दाखल; तर दुसरीकडे त्याच्या जामिनावर सुनावणी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.