पनवेल: 166 अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीत Andheri East Assembly by election नोटाला जे मतदान झाले ते फडणवीसांच्या नेतृत्वाखाली झाले असे जे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्याशी मी सहमत नाही. रमेश लटके हे आमचे विधानसभेचे सहकारी होते. त्यांच्या जाण्याने विधानसभेची जी रिक्त झालेली जागा होती. त्यासाठी लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिंदे आणि फडणवीस साहेबांनी पाठिंबा दिला होता. मात्र नोटाला मतदान का झाले याचे आत्मचिंतन प्रत्येक पक्षाने केले पाहिजे.
मतदान करण्यासाठी दबाव ज्यावेळेला शिंदे आणि फडणवीसांच्या विरोधात नेहमीच निगेटिव्ह प्रचार करणाऱ्यांच्या लक्षात आले की, नोटाला जास्त मतदान होणार आहे. मग आता वाईट कोणी केले तर शिंदे आणि फडणवीसांनी केले असा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे आत्मचिंतन करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांची शिवसेना करत असलेल्या अपप्रचाराशी मी सहमत नसल्याचे म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अंधेरीत नोटांचा वापर करुन 'नोटा'ला मतदान करण्यासाठी दबाव टाकल्याच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या आरोपाचे खंडन केले आहे.
आरोपाचे खंडन रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना 66530 मतं मिळाली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अंधेरी पोटनिवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. यात नोटाला दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे 12806 मतं मिळाली आहेत.