रायगड - तौक्ते चक्रीवादळाचा केंद्रबिंदू हा गुजरात होता. गुजरातमध्ये 45 जणांचा वादळात बळी गेला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका गुजरातमध्ये बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा करून परिस्थिती पाहून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. यावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात राजकारण पुन्हा एकदा पेटले असून या वादळाने बाधित झालेल्या इतर राज्यांनाही केंद्राकडून दिली जाणार आहे. त्यामुळे यावरून राजकारण करू नये, असे आवाहन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राजकारण करू नका -
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या रायगड दौऱ्यावर आहे. आज त्यांनी महाड पोलादपूर येथील नुकसान भागाची पाहणी केली. यावेळी गुजरातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपये पॅकेज जाहीर केले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, यावरून राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात या राज्यांना बसला आहे. गुजरात हे वादळाचे केंद्र बिंदू होते. त्यामुळे सर्वाधिक फटका हा गुजरात राज्याला बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जाऊन पाहणी केली. त्यानंतर एक हजार कोटीचे पॅकेज गुजरातला जाहीर केले. इतर राज्यानाही पॅकेज दिले जाणार, असे पंतप्रधान यांनी आपल्या प्रेसमोटमध्ये दिले आहे.
हेही वाचा - ईपीएफओ धारकाचा मृत्यू झाल्यास आता ७ लाखापर्यंत रक्कम मिळणार