ETV Bharat / state

डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - Minor girl's disobedience from DIG more

डीआयजी निशीकांत मोरे यांच्याकडून तरुणीच्या विनयभंगप्रकरणी आज न्यायालयात त्यांचा जामीन अर्जावर अंतिम सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान डीआयजी निशिकांत मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

डीआयजी निशिकांत मोरे यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
author img

By

Published : Jan 9, 2020, 7:30 PM IST

Updated : Jan 9, 2020, 10:19 PM IST

रायगड - डीआयजी असलेले निशिकांत मोरे यांच्याकडून तरुणीच्या विनयभंग प्रकरणी आज न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी झाली. काही वेळापूर्वीच पनवेल न्यायालयात दोन्ही पक्षाची बाजू वकिलांनी मांडली. या सुनावणी दरम्यान डीआयजी निशिकांत मोरे यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे. त्याचप्रमाणे डीआयजी निशिकांत मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

डीआयजी निशिकांत मोरे यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

यावेळी डीआयजी निशिकांत मोरे यांना अटक झालेली नसताना पीडित तरुणीला एक सुसाईड नोट लिहून आत्महत्या सारखा पर्याय स्वीकारावा लागतोय. त्यामुळे जर डीआयजी निशिकांत मोरे यांचा जमीन अर्ज स्वीकारला तर तिच्या जीवाला आणखी धोका असल्याचे पीडित तरुणीच्या वकिलांनी सांगितले.

पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट विभागात DIG असलेल्या निशिंकात मोरे यांच्यावर एका अल्पवयीन मुलीने गंभीर आरोप केले आहेत. जुन महिन्यात संबंधित मुलीचा वाढदिवस होता. निशिंकात मोरे आणि मुलीचे कुटुंबीय एकमेकांच्या परिचयाचे असल्याने मोरे त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करायला गेले होते. केक कापल्यानंतर मोरे यांनी या मुलीचा विनयभंग केला असल्याचा आरोप मुलीच्या कुटुबीयांनी केला होता. मात्र, त्यानंतर या प्रकरणाला वेगवेगळे वळण मिळू लागले आहे. डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचे आरोप करणारी एक सुसाईड नोट लिहून तरुणी बेपत्ता झाली. मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, माझ्या आत्महत्येस डीआयजी निशिकांत मोरे जबाबदार असल्याचे या सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे.

यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी पोलीस चालकाने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबाला डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले असे तरुणीच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांना निलंबन करण्यात आले आहे.

या सगळ्या घडामोडी घडत असताना डीआयजी निशिकांत मोरे यांनी अटकेपासून सुटका करण्याठी अटकपूर्व जामीन मिळावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज पनवेल न्यायालयात त्यांच्या जामिनावर अंतिम सुनावणी सुरू आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूने वकिलांनी आपली बाजू मांडली. यावेळी बेपत्ता मुलगी सापडली आहे. ती कुणासोबत गेली आहे, त्याचे पुरावे असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला असला तरी युक्तिवाद करताना कोणतेही पुरावे त्यांनी सादर केले नाहीत. त्याचपद्धतीने डीआयजीच्या पदावर काम करणारा व्यक्ती तरुणीचा विनयभंग कसा करू शकतो, असा सवाल बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. यावर पीडित तरुणीच्या वकिलांनी डीआयजी निशिकांत मोरे यांच्या पूर्वीच्या गंभीर गुन्हे प्रकरणातील पुरावे सादर केले असून त्यांना जर जामीन मिळाला. तर पीडित तरुणीच्या जीवाला आणखी धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी केला. काही तासानंतर पनवेल कोर्टाने निकाल जाहीर केला असून डीआयजी निशिकांत मोरे यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे.

चालकाची चौकशी सुरू -

पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे प्रकरणात आम्ही चौकशी केली आणि त्यात आम्हाला काही बाबी चुकीच्या आढळल्या आहेत. म्हणूनच गृहमंत्रालायकडून आम्ही त्यांच्या निलंबनाचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणात ज्या ड्रायव्हरवर आरोप केला जातोय, त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यावर सुद्धा लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

विनयभंग प्रकरणी नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेल्या पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यातर्फे पीडित मुलीच्या कुटुंबीयांना धमकी देण्याच्या आरोपाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यातील वाहन चालक दिनकर साळवे याची सुद्धा चौकशी करण्यात येत आहे.

Intro:सोबत बाईट्स आणि व्हिडीओ जोडले आहेत

पनवेल

डीआयजी असलेले निशिकांत मोरे यांच्याकडून तरुणीच्या विनयभंग प्रकरणी आज कोर्टात त्यांच्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होणार झाली. काही वेळापूर्वीच पनवेल कोर्टात दोन्ही पक्षाची बाजू वकिलांनी मांडली. या सुनावणी दरम्यान डीआयजी निशिकांत मोरे यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे. त्याचप्रमाणे डीआयजी निशिकांत मोरे यांना निलंबित करण्यात आलं आहे.Body:यावेळी डीआयजी निशिकांत मोरे यांना अटक झालेली नसताना पीडित तरुणीला एक सुसाईड नोट लिहून आत्महत्या सारखा पर्याय स्वीकारावा लागतोय, त्यामुळे जर डीआयजी निशिकांत मोरे यांचा जमीन अर्ज स्वीकारला तर तिच्या जीवाला आणखी धोका असल्याचं पीडित तरुणीच्या वकिलांनी सांगितलं होत.

पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट विभागात DIG असलेल्या निशिंकात मोरे यांच्यावर एका अल्पवयीन मुलीने गंभीर आरोप केले आहेत. जुन महिन्यात संबंधित मुलीचा वाढदिवस होता. निशिंकात मोरे आणि मुलीचे कुटुंबीय एकमेकांच्या परिचयाचे असल्याने मोरे त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करायला गेले होते. केक कापल्यानंतर मोरे यांनी या मुलीचा विनयभंग केला असल्याचा आरोप मुलीच्या कुटुबियांनी केला होता. मात्र त्यानंतर या प्रकरणाला वेगवेगळे वळण मिळू लागलंय.

डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचे आरोप करणारी तरुणी एक सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाली. मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, माझ्या आत्महत्येस डीआयजी निशिकांत मोरे जबाबदार असल्याचं या सुसाईड नोट मध्ये लिहिलंय.

त्यानंतर थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारी पोलीस चालकाने पीडित तरुणीच्या कुटुंबियांना धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबाला डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले असं तरुणीच्या वडिलांचं म्हणणं आहे. कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांना निलंबन करण्यात आलंय.
Conclusion:
या सगळ्या घडामोडी घडत असताना डीआयजी निशिकांत मोरे यांनी अटकेपासून सुटका करण्याठी अटकपूर्व जामीन मिळावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज पनवेल कोर्टात त्यांच्या जामिनावर अंतिम सुनावणी सुरू आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूने वकिलांनी आपली बाजू मांडली. यावेळी बेपत्ता मुलगी सापडली आहे आणि ती कुणासोबत गेली आहे त्याचे पुरावे असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला असला तरी युक्तिवाद करताना कोणतेही पुरावे त्यांनी सादर केले नाही. त्याचपद्धतीने डीआयजीच्या पदावर काम करणारा व्यक्ती तरुणीचा विनयभंग कसा करू शकतो असा सवाल बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. यावर पीडित तरुणीच्या वकिलांनी डीआयजी निशिकांत मोरे यांच्या पूर्वीच्या गंभीर गुन्हे प्रकरणातील पुरावे सादर केले असून त्यांना जर जामीन मिळाला तर पीडित तरुणीच्या जीवाला आणखी धोका निर्माण होऊ शकतो असा दावा पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी केला होता. काही तासानंतर पनवेल कोर्टाने निकाल जाहीर केला असून डीआयजी निशिकांत मोरे यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
Last Updated : Jan 9, 2020, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.